डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 16 February 2017 1:55 PM
डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयपीएल 2017 मधील पहिला सामना 5 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तर लीगचा अंतिम सामना याच स्टेडियममध्ये 21 मे रोजी होईल.

परंतु आयपीएलमध्ये सामील होणारे अनेक परदेशी क्रिकेटपटू संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. हे खेळाडू ही स्पर्धा मध्येच सोडून जाऊ शकतात.

या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा जॉस बटलर या खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंनीही याबाबत आपापल्या संघांना माहिती दिली आहे.

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू 7 मे नंतर स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. तर इंग्लंडचे खेळाडू 1 मे आणि 14 मे नंतर आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. हे सर्व खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहेत.

हे खेळाडू आयपीएल मध्येच सोडू शकतात –

एबी डिव्हिलिअर्स – दक्षिण आफ्रिका (रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर)

फाफ डू प्लेसिस – दक्षिण आफ्रिका (रायझिंग पुणे सुपरजायंट्स)

जेपी ड्युमिनी – दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेअरडेव्हिल्स)

क्विंटन डी कॉक – दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेयरडेविल्स)

ख्रिस मॉरिस  – दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेअरडेव्हिल्स)

जॉस बटलर – इंग्लंड (मुंबई इंडियन्स)

सॅम बिलिंग्स – इंग्लंड (दिल्ली डेयरडेविल्स)

First Published: Thursday, 16 February 2017 1:55 PM

Related Stories

पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट
पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानं

आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : बीसीसीआयने आयपीएल 2017 चं टाईमटेबल जाहीर केलं आहे. यंदा ही

तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा विक्रम
तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा...

बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर

अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?
अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली विरुद्ध कॅप्टनकूल

IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना
IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रॉयल

VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं
VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं

मुंबई: विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स टीम मैदानावर जितकी जीव ओतून

रंगेल ख्रिस गेलवर कारवाई होणार?
रंगेल ख्रिस गेलवर कारवाई होणार?

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कॅरेबियन सुपरस्टार ख्रिस गेलवर

हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम
हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम

नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट

एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत
एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत

बंगळुरु : एबी डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर रॉयल

आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया
आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा