फक्त 4 मिनिटं सायकल चालवा आणि फिट राहा !

By: | Last Updated: > Tuesday, 14 March 2017 2:21 PM
4 minutes cycling can stop cells from ageing quickly

नवी दिल्ली : सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे किमान 4 मिनटं सायकल चालवणंही शरीराला फायदेशीर ठरतं. वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होतात, त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठीही सायकल चालवणं फायद्याचं ठरतं. एका संशोधनातून हे समोर आले आहे.

सायकलिंग त्या सेल्सना रोखून ठेवतो, ज्यांमुळे वाढतं वय चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवत नाही. संशोधकांच्या माहितीनुसार, अनेकजणांचा असा समज असतो की लाँग बाईक राईड म्हणजेच जास्तीत जास्त अंतर सायकल चालवल्यास चांगला व्यायाम होतो. मात्र, अमेरिकेतील एका संशोधनातील माहितीनुसार, एका आठवड्यात 12 वेळा केवळ 4 मिनिटं सायकलिंग करणं म्हणजे ट्रेडमिलवर 90 मिनिटांपर्यंत वॉक करण्यासारखं आहे.

संशोधक 4 मिनिट सायकलिंगबाबत काय सांगतात?

मायो क्लिनिकच्या संशोधकांच्या माहितीनुसार, शॉर्ट बर्स्ट एक्सरसाईजमुळे शरीर तंदुरुस्त होतं. लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आणि डायबीटिजपासून दूर राहण्यासही सायकलिंगची मदत होते.

संशोधन कसं केलं?

18 ते 30 वयोगट आणि 65 ते 80 वयोगटातील 72 महिला आणि पुरुषांचा समावेश या संशोधनादरम्यान सर्वेक्षणात करण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींकडून हाय-इंटेसिटी ट्रेनिंगपासून वेट ट्रेनिंग, कंबाईन ट्रेनिंगसारख्या गोष्टी करवून घेतल्या.

संशोधनातून काय पुढे आलं?

वाढत्या वयाची चिन्ह चेहरा किंवा शरीरावर प्रकर्षाने जाणवतं, त्यापासून बचाव करण्यासाठी 4 मिनिटांची सायकलिंग फायदेशीर आहे. विशेष म्हणजे इतर औषधांपेक्षा सायकलिंग हा उपाय फलदायी आहे.

ज्यांना वर्कआऊटसाठी फारसा वेळ मिळत नाही, अशांसाठी सायकलिंगचा पर्याय उत्तम मानला जातो आहे. हे संशोधन सेल मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:4 minutes cycling can stop cells from ageing quickly
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?
तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच

21 वर्षीय पुरुषाची प्रसूती, ब्रिटनमध्ये गोंडस मुलीला जन्म
21 वर्षीय पुरुषाची प्रसूती, ब्रिटनमध्ये गोंडस मुलीला जन्म

लंडन : काही वर्षांपूर्वी अभिनेता अंकुश चौधरीचा ‘इश्श्य’

15 वर्षांच्या मुलाचा 73 वर्षीय महिलेशी 'प्रेमविवाह'
15 वर्षांच्या मुलाचा 73 वर्षीय महिलेशी 'प्रेमविवाह'

जकार्ता : प्रेमाला वयाचं बंधन नसतं. त्यामुळेच की काय एका 15 वर्षाच्या

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार
महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

मुंबई : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळण्यासाठी सुरु असलेल्या

लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स
लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स

मुंबई: सध्या लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा

रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!

मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन