जर तुम्ही लिक्विड सोपने हात धूत असाल तर सावधान!

By: | Last Updated: > Wednesday, 12 April 2017 4:19 PM
Are liquid hand soaps worth it?

मुंबई : ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही नियमित करता, त्याचा खरंच परिणाम होतो का? जर तुम्ही ट्रेन, जिम, ऑफिस किंवा रिसॉर्टमध्ये जीवाणूंबाबत चिंताग्रस्त असाल आणि त्यांना हॅण्ड जेलद्वारे मात देण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा.

खरंतर लिक्विड हॅण्ड जेल तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान देईल, पण त्याचा प्रभाव फार नसतो. अनेक वेळा तर त्याचा उलट परिणाम होतो. पण तुम्हाला लिक्विड हॅण्ड जेलबाबत जेवढी माहिती आहे, तेवढीच खरी आहे का?

जीवाणूंपासून सावधान!

लिक्विड हॅण्ड जेलची लोकप्रियता प्रत्येक देशात आहे. ब्रिटनमध्ये एक तृतीयांश लोक महिन्याला एकदा तरी लिक्विड जेल नक्कीच खरेदी करतात. हॅण्ड जेलमध्ये 60 टक्के अल्कोहल असतं.

जर याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असाल, तर जीवाणू तात्काळ नष्ट होतात. पण दीर्घ काळासाठी त्याचा खरा परिणाम फार वेगळाच असतो.

तुमच्या हातावर मातीचं किती प्रमाण आहे यावर लिक्विड हॅण्ड जेलचं यश अवलंबून असतं.

न्यूरोव्हायरस आणि सी. डिफिसाईलवर लिक्विड हॅण्ड जेलचा फारसा परिणाम होत नाही. खरंतर पाणी आणि साबणाने हात धुणं जास्त परिणामकारक ठरतं.

हॅण्ड जेल हानिकारक आहेत?

अभ्यासानुसार, हॅण्ड जेल तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. यात ट्रायकोल्सन असतं, ज्यामुळे हॉर्मोनमध्ये बदल होतात. इतकंच नाही तर यामुळे जीवाणू प्रतिकारशक्ती कमी होते.

ट्रायकोल्सनमुळे पोट आणि आतड्यामध्ये अडचणी निर्माण होतात. हे मुलांपासून दूर ठेवावं, कारण यामुळे उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता असते.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Are liquid hand soaps worth it?
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Liquid Hand Soap
First Published:

Related Stories

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!

नवी दिल्ली : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया

आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती
आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती

मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा

फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव
फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव

थिरुअनंतपुरम : सोशल मीडियाचे अनेक गैरवापर होतात, असं आपण बऱ्याचदा

तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?
तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?

मुंबई : तुम्ही घरातील भांडी धुवण्यासाठी वापरत असलेला स्पंज

...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु  नये: रिसर्च
...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु नये: रिसर्च

मुंबई: वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?
तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच