तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?

जर आपण स्पंज योग्यरित्या स्वच्छ केला नाही, तर याचा अर्थ आपण आपली भांडी जीवाणूंच्या थराने घासत आहोत,

तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?

मुंबई : तुम्ही घरातील भांडी धुवण्यासाठी वापरत असलेला स्पंज जीवाणूंनी भरलेला असू शकतो. जर्मनीमध्ये वैज्ञानिकांनी स्वयंपाकघरातील 14 स्पंजमधून मिळालेल्या सूक्ष्मजीवांच्या डीएनएचं संशोधन केलं. यामध्ये मोराक्सेला ऑस्लोएन्सिस यांसारखे जीवाणू सापडले. हे जीवाणू कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांमध्ये संसर्ग पसरवू शकतात.

विशेष म्हणजे घाणेरड्या कपड्यांमधून येणारा दुर्गंध याच जीवाणूंमुळेच येतो. लीबेश युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड मायक्रोबायोलॉजीचे मासिमिलानो कार्डिनाल यांच्या माहितीनुसार, किचन स्पंजमध्ये अपेक्षेपेक्षा फारच जास्त जीवाणू असतात, असं संशोधनातून समोर आलं आहे.

साबणाने स्पंज धुणं आणखीच धोकादायक

Kitchen_Sponge_2
सतत वापरले जाणाऱ्या किचन स्पंजमध्ये जीवाणू सहजरित्या वाढतात. स्पंज वारंवार साबणाने धुतल्याने ते स्वच्छ होतात असं जर तुम्हाला वाटतं तर ते चुकीचं आहे. उलट साबण आणि पाण्यामुळे स्पंजमध्ये खास प्रकारच्या जीवाणूंची वाढ होते.

स्पंज मायक्रोस्कोपखाली पाहिलं असता, घाणीमध्ये जेवढे जीवाणू असतात तेवढचे जीवाणू एक क्युबिक सेंटीमीटर स्पंजमध्ये असतात. पण आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे स्पंज उकळल्याने किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करुनही जीवाणू नष्ट होत नाही.

त्याउलट पाणी, साबण किंवा पावडरद्वारे धुतल्या जाणाऱ्या स्पंजमध्ये धोकादायक जीवाणूंची वाढ होते. धोकादायक जीवाणू अतिशय प्रतिरोधकही असतात आणि डिटर्जंटद्वारे साफ होणाऱ्या इतर जीवाणूंच्या जागी त्यांची वाढ होते.

ब्लीच सोल्यूशन

Kitchen_Sponge_1
काही जाणकार, स्पंजला ब्लीच सोल्यूशनने धुण्याचा सल्ला देतात. जर आपण स्पंज योग्यरित्या स्वच्छ केला नाही, तर याचा अर्थ आपण आपली भांडी जीवाणूंच्या थराने घासत आहोत, असं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील मायक्रबायोलॉजी विभागाचे प्राध्यापक फिलिप टिएर्नो म्हणाले.

9 भाग पाणी आणि 1 भाग ब्लीच मिसळून, यात स्पंज स्वच्छ केल्यास योग्य ठरेल. कायम ग्लोव्ह्ज घालून स्पंजवर ते मिश्रण टाकावं. ते 10 ते 30 सेकंद तसंच ठेवून स्पंज पिळून सुकवावा

प्रत्येक वापरानंतर जर स्पंज धुणं शक्य नसेल तर जर्मनीचे वैज्ञानिक दुसरी पद्धत सांगतात. 'प्रत्येक आठवड्यात स्पंज बदलावा. जर स्पंजमधून दुर्गंध येत असे तर तो जीवाणूंनी भरलेला आहे, असं फिलिप टिएर्नो यांनी सांगितलं.

जर्मन वैज्ञानिकांचं हे संशोधन ऑनलाईन वैज्ञानिक जर्नल 'सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये छापलं आहे.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV