तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 19 May 2017 5:26 PM
तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?

नवी दिल्ली : अनेक महिलांकडून ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकलं असेल. अनेकांना त्यात तथ्य नसून, ते एक मिथक वाटतं. पण ब्यूटी स्लीप मिथक नसून, सत्य आहे. एका नव्या संशोधनानुसार, वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो, असा दावा करण्यात आला आहे.

रॉयल सोसायटी ओपन सायन्स जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चनुसार, जर एखाद्या व्यक्तीची दोन रात्र पूर्ण झोप झाली नसेल, तर त्याच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबतचं संशोधन केलं आहे.

या संशोधनसाठी डॉक्टरांनी 25 जणांचं अध्ययन केलं. यातील एका समुहाला दोन रात्र मनसोक्त झोपण्यास सांगितलं होतं. तर दुसऱ्या समुहाला दोन रात्रींसाठी केवळ चार-चार तास झोप घेण्यास सांगितलं होतं.

या अध्ययनावेळी दोन्ही समुहातील व्यक्तींचे मेकअपशिवाय फोटो काढण्यात आले. त्यांचे हे फोटो 122 अज्ञात लोकांना दाखवून यामधील अॅक्टिव्ह, हेल्दी, उत्साही, आणि विश्वसनीय कोण वाटतो, असं विचारलं. यावेळी अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली.

पण यातील बहुतांश जणांनी ज्या लोकांची चार-चार तासच झोप झाली होती, त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर ज्यांची झोप पूर्ण झाली होती, ते सर्वाधिक उत्साही आणि त्यांच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता होती.

यावरुन ज्यांची झोप वेळेवर होते, त्यांचं आरोग्यही चांगलं असतं, तसेच ते सदैव उत्साही असतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच यामुळे लोक तुमच्या व्यक्तीमत्त्वाप्रती सकारात्मक असतात असंही संशोधकांनी सांगितलं.

त्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी रोज आठ तास झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टीप : या संशोधनातील दाव्यांची एबीपी माझाने पडताळणी केली नाही. पण यासाठी तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता.

First Published: Friday, 19 May 2017 5:17 PM

Related Stories

फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!
फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

मुंबई: निरोगी आयुष्यासाठी फिटनेस नेहमीच महत्वाचा असतो. पण बरेच जण

फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!
फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!

नवी दिल्ली : तुम्हाला रात्री झोप लागत नाही? जर उत्तर ‘हो’ असेल, तर

'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!
'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!

मुंबई: जीवघेण्या कॅन्सरवर (कर्करोग) काहीशा प्रमाणात उपाय शोधण्यात

वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!
वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!

बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये आईची भूमिका

केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!
केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!

मुंबई: दिवसभर धावपळ करुनही आपल्यापैकी अनेकांना शांत झोप मिळत नाही.

रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना यकृताचे आजार उद्भवू शकतात?
रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना यकृताचे आजार उद्भवू शकतात?

लंडन : रात्रपाळी (नाईट शिफ्ट) मध्ये काम करणे तुमच्या

तुम्हालाही रात्री झोप येत नाही का? खास टिप्स
तुम्हालाही रात्री झोप येत नाही का? खास टिप्स

मुंबई : कितीही प्रयत्न केले तरी अनेकांना रात्री झोप येत नाही. झोप

स्मार्टफोनचा वापर जरा जपूनच करा, नाहीतर...
स्मार्टफोनचा वापर जरा जपूनच करा, नाहीतर...

न्यूयॉर्क: स्मार्टफोन आणि गॅजेट्सच्या अधिक वापरामुळे किशोरवयीन

... म्हणून उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर टाळा!
... म्हणून उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर टाळा!

नवी दिल्ली : उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी