कलर डेनिम... तरुणाईसाठी नवं फॅशन स्टेटमेंट

आपल्या स्किनटोनशी साजेसे कलर डेनिम निवडावी. अनेक कलर्सची रेंज बाजारात उपलब्ध आहे.

कलर डेनिम... तरुणाईसाठी नवं फॅशन स्टेटमेंट

मुंबई : फॅशन फ्रेण्डली तरुणाईला दरदिवशी वेगवेगळी स्टाईल करण्याची सवय असते. सध्या डेनिम म्हणजे सर्वात कूल पर्याय. डेनिम वापरताना आपण नेहमी ब्लू आणि ब्लॅक हे दोनच ऑप्शन जास्त निवडतो, पण सध्या तरुणाई साठी "कलर डेनिम" हा भन्नाट ऑप्शन उपलब्ध झाला आहे.

कलर डेनिम ही संकल्पना जितकी नवीन आहे, तितकीच हटकेसुद्धा आहे. ज्याप्रमाणे तरुणी एखाद्या कुर्त्यावर लेगिन्स मॅच करतात, तसंच या कलर डेनिमही वापरता येतात.

कलर डेनिम घालताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबद्दल स्पायकर इंडियाचे डिझायनर हेड अभिषेक यादव यांच्या टिप्स

जीन्स फीट : जीन्स घेताना कधीही कमरेची साईज बघून घेणं आवश्यक असतं. त्यात कलर डेनिम घेताना आपल्या बॉडी टाईप नुसार कलर डेनिम पसंत करावी. खासकरुन ब्लू जीन्स स्किनी फिट आणि रेग्युलर फिटिंग मध्ये उपलब्ध असते. अशा डेनिम सर्व बॉडी टाईप वर शोभून दिसतात.

Colour Denim

कलर : कलर डेनिम निवडताना आपल्या स्किनटोनचाही विचार करावा. आपण त्यावर शर्ट, टी-शर्ट की एखादा टॉप घालत आहोत, हे लक्षात घ्यावं. त्याशिवाय ऑफिस, आऊटिंग किंवा पार्टी असं ओकेजन लक्षात घ्या. आपल्या स्किनटोनशी साजेसे कलर डेनिम निवडावी. अनेक कलर्सची रेंज बाजारात उपलब्ध आहे.

Colour Denim 4

टॉपवेअर ऑप्शन : आपण डेनिम कोणत्या टॉप किंवा शर्टवर घालणार आहोत, त्यानुसारच डेनिमची निवड करावी. ऑफिसमध्ये सहसा डार्क रंगाची डेनिम वापरली तर एखादा चेक्स किंवा प्लेन टॉप किंवा टी-शर्ट वापरावा. फिक्या रंगाची डेनिम असल्यास त्यावर फ्लोरल प्रिंटचा एखादा टॉप फ्रेश लूक देतो. पांढरा, राखाडी यासारखे न्यूट्रल रंग टॉपवेअर डार्क कलरच्या डेनिमवर सूट होतात.

ओकेजन : पार्टी, ऑफिस किंवा एखाद्या ट्रीपमध्ये सर्वात हटके दिसण्यासाठी कलर डेनिम हा "ऑल टाईम बेस्ट" ऑप्शन आहे. आणि सर्वात स्टायलिश दिसण्यासाठी यंगस्टर्स अशा डेनिमला पसंती देतात.

Colour Denim 3
स्टाईल : जेव्हा तुम्ही एखादी डेनिम निवडता, तेव्हा ती केवळ फिटिंग किंवा कलरनुसारच नाही, तर डिझाईन व स्टायलिंग याची उत्तम सांगड असणंही महत्त्वाचं असतं.

फॅब्रिक : कलर डेनिम घेताना त्याचा दर्जा तपासणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण डेनिम घालतो, ती बराच वेळासाठी आपल्या स्किनला लागून असते. अशावेळी त्याचा दर्जा व त्यामध्ये कॉटनचा वापर जास्त असावा. त्यासाठी त्या कपड्याची माहिती पाहावी.

Colour Denim 2

डेनिमचं वजन : सीझननुसार डेनिमचं सिलेक्शन करावं. लाईट वेट डेनिम या उन्हाळ्यात वापरु शकता, मिडियम वेट डेनिम या एव्हरग्रीन असतात. तर जास्त वजनाच्या डेनिम या थंडीत वापरण्यास बऱ्या पडतात.

कलर डेनिम आपल्याला नेहमीच स्टायलिश लूक देतात. पण एकाच रंगाचे टॉप आणि बॉटमवेयर असा पर्याय आपल्या स्टाईल स्टेटमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Colour Denim : New Fashion statement for youngsters latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV