22 पेटत्या मेणबत्या तोंडात धरुन शिक्षकाचा नवा विक्रम

मुंबईमधील दिनेश उपाध्याय या शिक्षकाने 22 पेटत्या मेणबत्या तोंडात ठेऊन नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

22 पेटत्या मेणबत्या तोंडात धरुन शिक्षकाचा नवा विक्रम

मुंबई : मुंबईमधील दिनेश उपाध्याय या शिक्षकाने 22 पेटत्या मेणबत्या तोंडात ठेऊन नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. त्यांच्या नावावर आत्तापर्यंत 89 विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असल्याचा दावा केला जात आहेत.

तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील 57 विक्रम त्यांच्या नावावर नोंद असल्याचं सांगितलं जातं.

नुकतेच त्यांनी 57 पेटत्या मेणबत्या तोंडात धरुन नवा विक्रम केला आहे. विशेष म्हज, त्यांनी याचा एक व्हिडीओही तयार केला असून, तो फेसबुकवर अपलोड केला आहे. अन् असा स्टंट कोणीही करु नये, असं आवाहनही केलं आहे.

दिनेश यांनी अपलोड केलेला व्हिडीओ लाखो फेसबुक युझर्सनी पाहिला आहे.

यापूर्वी त्यांनी एका मिनिटात 74 द्राक्षं खाण्याचाही विक्रम केला आहे. तसेच, एका हातात 10 बिलियर्ड बॉल पकडण्याचाही विक्रम केल्याचा दावा केला जात आहे.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV