माणसाच्या पोटात 2 मीटर लांब, सहा फूट उंचीचा जंत

By: | Last Updated: > Thursday, 9 February 2017 2:46 PM
doctors-remove-6-foot-long-tapeworm-from-mans-gut

नवी दिल्ली: पीव्हीएस मेमोरियल हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी एका रुग्णावर शस्त्रक्रिया करुन तब्बल 2 मीटर लांब आणि सहा फूट उंचीचा जंत बाहेर काढला आहे. या व्यक्तीच्या पोटातून काढलेल्या जंताचे वैज्ञानिक नाव ‘ताइनिया सोलियम’असं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या शस्त्रक्रियेनंतर हॉस्पीटलचे तज्ज्ञ डॉक्टर फिलीप्स यांनीही यापूर्वी इतका मोठा जंत कधीही पाहिला नसल्याचं सांगितलं.

द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या एका अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या 48 वर्षीय रुग्णाला गेल्या दोन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. यावर त्यांनी अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतला. पण तरीही त्याची पोटदुखी काही कमी होत नव्हती, उलट त्यांचा अशक्तपणा वाढतच होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना काही तपासण्या करण्यास सांगितले. त्यातून त्याच्या पोटात इतका मोठा जंत असल्याचे निष्पन्न झालं.

यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोलनस्कोपी आणि अँजोस्कोपी केली. यातून या जंताचा आकार 2 मीटर लांब आणि सहा फूट उंच असल्याचं दिसून आलं. हा जंत त्या व्यक्तीच्या वरच्या भागातील आतड्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी जवळपास 1 तासाची शस्त्रक्रिया करुन त्याच्या पोटातून जंत तोंडावाटे बाहेर काढला.

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन यांच्या मते, हा किडा 3.5 मीटर म्हणजे 11.5 फूच लांब असू शकतो. तसेच हा अनेक वर्ष पोटात जीवंत राहू  शकतो असंही सांगितलंय. अशा किड्यांमुळे कसलंही इन्फेक्शन होत नसतं, पण पोटदुखी सुरु झाल्यानंतर त्याच्या वेदना असहय्य असल्याचं डॉक्टर सांगितलं.

डॉक्टर फिलीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीवर जवळपास 1 तास 15 मिनिट शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या शरीरातील इतर जंतही नष्ट व्हावेत यासाठी अॅन्टी पॅरासिटिक मेडिसिन दिले जात असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

 

व्हिडिओ पाहा

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:doctors-remove-6-foot-long-tapeworm-from-mans-gut
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार
कन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार

मुंबई : कॅन्सरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!

नवी दिल्ली : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया

आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती
आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती

मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा

फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव
फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव

थिरुअनंतपुरम : सोशल मीडियाचे अनेक गैरवापर होतात, असं आपण बऱ्याचदा

तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?
तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?

मुंबई : तुम्ही घरातील भांडी धुवण्यासाठी वापरत असलेला स्पंज

...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु  नये: रिसर्च
...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु नये: रिसर्च

मुंबई: वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या