... म्हणून टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

... म्हणून टरबूज-खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

मुंबई : टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं. याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. मात्र टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये, याची माहिती एबीपी माझाने डायटिशियन डॉ. डिंपल शर्मा यांच्याकडून जाणून घेतली आहे.

  • टरबुजामध्ये 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे अगोदरच पाण्याचं एवढं प्रमाण असताना त्यावर आणखी पाणी पिऊ नये, असं सांगितलं जातं.

  • अन्न खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिल्यास पोटात पाण्याचं अन्नासोबत मिश्रण होतं. शिवाय अन्न चांगल्या प्रकारे पचनही होत नाही.

  • अन्नासोबत जास्त पाणी पिल्यास शरीरात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होईल आणि पोट भरल्यासारखं वाटेल. त्यामुळे जेवणासोबत जास्त पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.

  • मात्र अनेक फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. फळं खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिल्यास तुम्हाला जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात.

  • पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकतं, असं डॉक्टर सांगतात.

  • अन्न किंवा फळांवर जास्त पाणी पिल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे अन्न पचन होण्याऐवजी अन्न आणि पाण्याचं मिश्रण होतं.

  • उदाहरणार्थ दोन चपात्या घेतल्या आणि त्यावर एक ग्लास पाणी टाकलं. चपाती पाण्यात मिसळून जाईल, मात्र त्याचं व्यवस्थितपणे मिश्रण होणार नाही आणि ते खराब होईल. तसंच पोटाच्या बाबतीतही होतं, जेव्हा आपण जेवणानंतर पाणी पितो, असं उदाहरण डॉक्टर देतात.

  • जेवणानंतर थोडं थांबून पाणी पिऊ शकतो, कारण पोटाला पचन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो.

  • फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी हे फळं खाणं टाळावं, असं डॉक्टर सांगतात.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV