मच्छर चावल्यास हा इलेक्ट्रॉनिक पेन वापरा!

मच्छर चावल्यानंतर येणारी खाज आणि पुरळ घालवण्यासाठी नुकतंच एक इलेक्ट्रिक पेन लाँच करण्यात आलं आहे.

मच्छर चावल्यास हा इलेक्ट्रॉनिक पेन वापरा!

मुंबई : मच्छर चावल्यानंतर अनेकदा आपल्या त्वचेवर पुरळ उठतात किंवा खाज सुटते. तसेच त्वचेवर लाल डागही दिसतात. यामुळे समस्येनं अनेकजण त्रस्त आहेत. मात्र, आता सर्वावर एक नवा उपाय शोधण्यात आला आहे.

मच्छर चावल्यानंतर येणारी खाज आणि पुरळ घालवण्यासाठी नुकतंच एक इलेक्ट्रिक पेन लाँच करण्यात आलं आहे. या पेनचा वापर केल्यास खाज येणं तात्काळ बंद होतं. तसेच त्वचेवरील डागही नाहीसे होतात.

मच्छर चावलेल्या ठिकाणी हा पेन फक्त 45 सेंकद लावायचा. त्यानंतर त्याठिकाणी पेनमधून येणारं व्हायब्रेशन तात्काळ काम करण सुरु करतं. मच्छर चावलेल्या ठिकाणी पेन लावल्यानंतर तेथील रक्तपुरवठा लागलीच सुरळीत होतो.


हा पेन संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे. जो एका विशिष्ट पद्धतीनं डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही रासायनिक द्रवं वापरण्यात आलेले नाही. या पेनमध्ये काही विशिष्ट बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे यामधून व्हायब्रेशन सुरु होतं. हेच व्हायब्रेशन तुमच्या त्वचेवर काम करतं. त्यामुळे आता मच्छर चावल्यास हैराण होऊ नका तर फक्त हा पेन वापरा असा दावा हा पेन तयार करणाऱ्या कंपनीनं केला आहे.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV