सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

मुंबई : अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. मात्र, मुलांनी शांत बसावं म्हणून स्मार्टफोन देणं भविष्यात धोकादायक ठरु शकतं. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं म्हणजे कुणाला ड्रग्ज देण्यासारखं आहे.

चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं म्हणजे कोकेनसारखे पदार्थ देण्यासारखे आहे आणि अशामुळे मुलांना स्मार्टफोनच्या व्यसनात तुम्ही ढकलत असता, असे या अभ्यासात म्हटलं आहे.

स्मार्टफोन वापरमुळे होणारे नुकसान (अभ्यासानुसार) :

  • स्मार्टफोनवर गेम खेळणारे चिमुरडे आई-वडिलांसोबत खूप कमी वेळ घालवतात.

  • तंत्रज्ञानाच्या सहवासात आल्यानंतर चिमुरड्यांचा मानसिक विकास नीट होत नाही आणि त्यामुळे बुद्धीवर परिणाम होतो.

  • स्मार्टफोनवर वेळ घालवणाऱ्या मुलांमधील क्रिएटिव्हिटी कमी होते. त्यामुळे योग्य निर्णय घेणंही त्यांना शक्य होत नाही.

  • स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांची शारीरिक हालचालही कमी होते. त्यामुळे शारीरिक विकासावर परिणाम होतो.


वरील अभ्यासातून हे स्पष्ट होतं की, चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं धोकायदायक ठरु शकतं.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: children smartphone स्मार्टफोन
First Published:
LiveTV