तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. त्यामुळेच लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि मोबाईलचा उपयोग ही लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत.

लठ्ठपणा टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :

  • मुलं लठ्ठ होत असतील, तर त्यांना सतत रागावू नका किंवा टोमणे मारु नका. त्यामुळे लहान मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो.

  • मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यसाठी पालकांनीच स्वतः पोषक आहार घ्यावा, ज्यामुळे मुलंही पालकांनी घेतलेलाच आहार घेतील.

  • कोणत्याही बाबतीत तुमच्या मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करु नका. अभ्यास, राहणीमान किंवा लठ्ठपणा, अशा कोणत्याही बाबतीत इतरांच्या मुलांशी तुमच्या मुलांची तुलना करु नका.

  • मुलं सध्या मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि कंप्युटर यामुळे घरातच मग्न असतात. त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावा.

  • मुलांचा एक डाएट प्लॅन तयार करा. त्यानुसारच पोषक आहार मुलांना द्या.

  • मुलांना पिझ्झा-बर्गर यांसारख्या फास्ट फूडची सवय असते. त्यामुळे मुलांना शक्य होईल तेवढे घरचेचं खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.


टीप : ही माहिती संशोधनाच्या आधारावर देण्यात आलेली आहे. एबीपी माझा याबाबत पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सल्ल्यानुसार उपचार सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV