या देशातल्या महिला प्रेमापासून दूर राहतात!

कामाच्या वाढत्या व्यापामुळे जवळपास 60 टक्के महिला प्रेमापासून दूर राहतात.

या देशातल्या महिला प्रेमापासून दूर राहतात!

टोकियो : कामाच्या वाढत्या व्यापामुळे जवळपास 60 टक्के महिला प्रेमापासून दूर राहतात. हे आम्ही नाही म्हणत, एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

सर्व्हे काय सांगतो?

ऑनलाईन डेटिंग वेबसाईट ‘कोकोलोनी डॉट जेपी’ने हा सर्व्हे केला आहे. जपानमध्ये महिलावंर पुरुषांप्रमाणेच कामाचा ताण आहे. त्यामुळे काम संपल्यानंतर महिला डेटिंगला जाण्याऐवजी सोफ्यावर झोपून आराम करणं आणि टीव्ही पाहणं पसंत करतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे.

''ब्लाईंड डेट ताणतणाव वाढवतात''

सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ऑफिसमध्ये प्रेमात पडण्याविषयीची आकर्षकता आता कमी झाली आहे. शिवाय ब्लाईंड डेटवर जाणं हे देखील महिलांसाठी कंटाळवाणं झालं असल्याचं सर्व्हेमधून समोर आलं आहे.

सर्व्हेनुसार, चार पैकी एका महिलेने हे स्वीकारलं की, काम करताना थकल्यामुळे डेटिंगला गेलेलं असतानाच झोप लागली.

''ऑनलाईन डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय''

डेटवर न जाणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. कारण डेट करणं हा त्यांना वेळेचा अपव्यय वाटत असल्याचं ऑनलाईन डेटिंग साईट ‘लव्हली मीडिया’ने म्हटलं आहे.

काम, मातृत्त्व आणि पितृत्त्व यांमधून वेळ मिळाला तरच महिला प्रेमाच्या बाबतीत विचार करतात, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Japanese women’s dont have time to do love due to busy work
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV