फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव

मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी गावातील रंजिश मंजेरी या 34 वर्षीय तरुणाने मॅट्रिमोनी जाहिरात फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर रंजिशवर अक्षरश: स्थळांचा वर्षावच झाला.

By: | Last Updated: > Friday, 4 August 2017 11:08 AM
Kerala youth flooded with proposals after Facebook matrimony advt goes viral

थिरुअनंतपुरम : सोशल मीडियाचे अनेक गैरवापर होतात, असं आपण बऱ्याचदा ऐकतो, वाचतो. पण सोशल मीडियामुळे एखाद्याला आयुष्यभराचा सोबती मिळण्यास मदत झाली हे केरळमधील एका तरुणाच्या अनुभवावरुन समोर आलं आहे.

मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी गावातील रंजिश मंजेरी या 34 वर्षीय तरुणाने मॅट्रिमोनी जाहिरात फेसबुकवर पोस्ट केली. यानंतर रंजिशवर अक्षरश:  स्थळांचा वर्षावच झाला. रंजिश हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे.

“माझं लग्न अजून ठरलेलं नाही. जर तुमच्या माहितीत कोणी असेल तर मला नक्की कळवा. मी 34 वर्षांचा आहे. मला तिला भेटण्याची इच्छा आहे आणि मला ती आवडायला हवी. माझ्या इतर कोणत्याही अटी नाहीत. काम : प्रोफेशनल फोटोग्राफ. हिंदू. जातीची अट नाही. वडील, आई आणि विवाहित बहिण असं माझं कुटुंब आहे,” अशी पोस्ट रंजिशने फेसबुकवर लिहिली आहे.

मॅट्रिमोनियन वेबसाईट आणि नातेवाईंकाच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतरही वधू न मिळाल्याने एका मित्राच्या सल्ल्याने रंजिशने 28 जुलै रोजी फेसबुकवर जाहिरात पोस्ट केली.

दिवसभरातच त्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. तब्बल 4000 जणांनी त्याची पोस्ट शेअर केली.  त्याच्या पोस्टवर 1000 कमेंट्स, 16,000 रिअॅक्शन आल्या. काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या, तर काही त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

“रंजिशच्या पोस्टनंतर अमेरिकेतील एका वैज्ञानिक तरुणीने त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण जर त्यांचं जुळलं नाही तर मी फोटोग्राफरसोबत त्याचं लग्न जुळवून देईन,” असं एका युझरने लिहिलं आहे.

“ही अगदी चांगली कल्पना आहे. यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही. देव तुझ्यावर कृपा करो,” असं आणखी एका युझरने लिहिलं आहे.

“रंजिशने या पोस्टमध्ये त्याचा मोबाईल नंबर लिहिला आहे. पोस्टनंतर मला जगभरातून अनेक इच्छुकांचे कॉल आणि मेसेज येत आहेत. काही खोडकर कॉल वगळता भारत, ऑस्ट्रेलिया, बहारीन, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून अनेक कुटुंबांनी प्रामाणिकपणे चौकशी केली,” असंही रंजिश मंजेरीने सांगितलं.

“माझ्याच वयाच्या असेलेल्या मुलींकडून चौकशी होत आहे, तर काही घटस्फोटित. शेकडो प्रस्तावांमधून एकीची निवड करणं अतिशय कठीण आहे. फोटो आणि इतर माहिती पाठवण्यासाठी अनेकांना मी माझा व्हॉट्सअॅप नंबर दिल्याचं रंजिशने सांगितलं.

परदेशी मुलीसोबत लग्न करायला तयार आहेस का? असं विचारलं असता रंजिश म्हणाला की, “परदेशी मुलीशी लग्न करण्यास मला काहीच हरकत नाही. त्याच्या फायदा-तोट्याचा मला विचार करावा लागेल. मी आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बहिणीचं लग्न झालं असून तिला 18 वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे फार जबाबदारी नाही.”

माझं हे पाऊल इतर तरुणांना सोशल मीडियाच्या ताकदीची जाणीव करण्यास प्रोत्साहन देईल, असं रंजिश मंजेरी म्हणाला.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kerala youth flooded with proposals after Facebook matrimony advt goes viral
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का?...

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया

आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती
आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय......

मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा

तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?
तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत...

मुंबई : तुम्ही घरातील भांडी धुवण्यासाठी वापरत असलेला स्पंज

...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु  नये: रिसर्च
...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर...

मुंबई: वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत...

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?
तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या...

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच

21 वर्षीय पुरुषाची प्रसूती, ब्रिटनमध्ये गोंडस मुलीला जन्म
21 वर्षीय पुरुषाची प्रसूती,...

लंडन : काही वर्षांपूर्वी अभिनेता अंकुश चौधरीचा ‘इश्श्य’

15 वर्षांच्या मुलाचा 73 वर्षीय महिलेशी 'प्रेमविवाह'
15 वर्षांच्या मुलाचा 73 वर्षीय महिलेशी...

जकार्ता : प्रेमाला वयाचं बंधन नसतं. त्यामुळेच की काय एका 15 वर्षाच्या