डाव्या हातांनी काम करणारे नास्तिक असण्याची शक्यता जास्त : सर्व्हे

रिव्हॉल्युशनरी सायकॉलॉजिकल सायन्समध्ये यासंदर्भातील सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे.

डाव्या हातांनी काम करणारे नास्तिक असण्याची शक्यता जास्त : सर्व्हे

लंडन : डाव्या हातांनी काम करणारी माणसं नास्तिक असण्याची शक्यता जास्त असते, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. रिव्हॉल्युशनरी सायकॉलॉजिकल सायन्समध्ये यासंदर्भातील सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे.

सर्वेक्षणानुसार, देवावर विश्वास नसलेली अधिकाधिक माणसं डाव्या हाताने काम करणारी असतात. शिवाय, आधुनिक युगातील लोकांचा आधीपेक्षा जास्त देवावर विश्वास असल्याचेही यात समोर आले आहे.

‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, संशोधकांनी डाव्या हातांनी काम करणारे लोक आणि आत्मकेंद्रित लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे सर्वेक्षण केले. त्यांचा अभ्यास करुन, ते किती प्रमाणात धार्मिक आहेत, याचे अंदाज बांधले.

फिनलँडमधील औलू विश्वविद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिकीकरणाच्या पूर्वीच्या काळात धर्माकडची ओढ ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात होती.

अर्थात, औलू विश्वविद्यापीठातील संशोधकांनी विशिष्ट संख्येच्या लोकांचा अभ्यास करुन, प्रातिनिधिक स्वरुपात हे सर्वेक्षण केले आहे.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Left handed people are more atheists, says survey
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV