एनर्जी ड्रिंक्स आणि दारुचं मिश्रण प्राणघातक!

एखाद्या 200 मिलीलीटरच्या एनर्जी ड्रिंक्समध्ये 100 मिलीग्रॅम उत्तेजक द्रव्य असतं.

एनर्जी ड्रिंक्स आणि दारुचं मिश्रण प्राणघातक!

हैदराबाद : एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी डॅमेज होण्याची आणि ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता वाढवतात. तसेच हृदयावर प्रतिकूल परिणाम होतात, असे डॉक्टरांच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. त्याचबरोबर, दारु आणि एनर्जी ड्रिंक्स एकत्रित प्यायल्यास झिंग चढते, असेही म्हटले आहे.

हैदराबदमधील एका किडनीरोग तज्ज्ञांच्या मते, एनर्जी ड्रिंक्समध्ये फॉस्फोरस आणि फॉस्फोरिक अॅसिड असतं, त्यामुळे त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.

जेव्हा दारुमध्ये एनर्जी ड्रिंक्स मिसळून प्यायलं जातं, त्यावेळी त्यातील उत्तेजक द्रव्य पिणाऱ्याला अक्रियाशील करतं. त्यामुळे पिणाऱ्याला कुठलंही भान राहत नाही आणि तो सतत पित जातो. त्यामुळे पिणाऱ्याला अधिक झिंग चढते.

त्याचबरोबर, एनर्जी ड्रिंक्स आणि दारु यांचं मिश्रण मळमळ होण्यास आणि किडनीवर परिणाम करण्यास कारणीभूत ठरतं. कारण उत्तेजक द्रव्य शरीरातील पाणी कमी करतं.

एनर्जी ड्रिंक्ससोबत दारु पिणाऱ्यांचे अपघात होण्याची शक्यता वाढते. कारण ते एवढ्या प्रमाणात झिंगलेले असतात की, त्यांना कोणतेही भान उरत नाही. एनर्जी ड्रिंक्स पिणाऱ्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये 6.4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

एनर्जी ड्रिंक्समधील उत्तेजक द्रव्य हृदयाला घातक असतातच. शिवाय, तेच एनर्जी ड्रिंक्स दारुमधून प्यायल्यास हृदयच्या रक्तपुरवठ्यावरही परिणाम करतात. त्याचबरोबर, अरिथिमिया वाढवतं, ज्यामुळे हृदयाचे ठोके व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे हृदयाला नुकसान होण्याची शक्यता वाढते.

एखाद्या 200 मिलीलीटरच्या एनर्जी ड्रिंक्समध्ये 100 मिलीग्रॅम उत्तेजक द्रव्य असतं.

अनेक एनर्जी ड्रिंक्सवर सूचना असते की, लहान मुलांनी पिऊ नये. मात्र, प्रत्यक्षात त्याउलट पाहायला मिळतं. एनर्जी ड्रिंक्स सेवन करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संध्या लहान मुलांची आणि तरुणांची आहे.

दरम्यान, दारुसोबत एनर्जी ड्रिंक्स सेवन करण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही योग्य.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mixer of Energy drinks and alcohol lead to kidney damage latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV