सोनं खरेदीवेळी या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

बऱ्याचदा सोनं खरेदी करताना फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी पुढील 5 गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

By: | Last Updated: > Tuesday, 17 October 2017 11:02 AM
Remember these 5 things when buying gold

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते. पण बऱ्याचदा सोनं खरेदी करताना फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. सोनं खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ नये यासाठी पुढील 5 गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

1. सोन्याची शुद्धता : शुद्ध सोन्यासाठी कॅरेट हे मापक आहे. 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं समजलं जातं. पण 24 कॅरेटचं सोनं दागिने बनविण्यासाठी करता येत नाही. दागिने तयार करताना 22 कॅरेट सोन्यासोबत 2 कॅरेट चांदी मिक्स केली जाते. त्यामुळे एक गोष्ट जरुर लक्षात घ्या की, तुम्ही जे काही सोनं खरेदी कराल ते 22 कॅरेटपेक्षा कमी असता कामा नये.

 

gold 1

 

2. शुद्ध सोनं ओळखण्याच्या पद्धती : सोनं खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी भारत सरकारकडून इंडियन स्टँडर्ड ऑफ ब्युरोची स्थापना करण्यात आली आहे.  इंडियन स्टँडर्ड ऑफ ब्युरो हे खऱ्या सोन्याची ओळख पटावी यासाठी त्यावर शुद्धतेचं मापक समजलं जाणारं हॉलमार्क लावतं. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी त्यावर हॉलमार्क आहे की, नाही हे तपासून पाहा

3. तुम्ही गोल्ड कॉइन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच्या पॅकेजिंगकडे जरुर लक्ष द्या. गोल्ड कॉइनची पॅकेजिंग पहिल्यापासून खुली असता कामा नये. त्याची पॅकेजिंग हीच त्याच्या खरेपणाची मोठी ओळख आहे.

 

90075023

 

4. बाजारात सोन्याची नाणी ही 0.5 ग्रामपासून 50 ग्रामच्या वजनापर्यंत उपलब्ध आहेत. 16 ऑक्टोबरला बाजारात सोन्याचा दर हा 30,850 रुपये आहे.

5. सोन्याचे दर हे दररोज बदलत असतात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करत आहात त्या दिवशी सोन्याचा दर किती आहे याची खात्री करुन घ्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए)च्या अंतर्गत रत्न आणि सोन खरेदीवर 2 लाखांपर्यंत पॅन सूट देण्यात आली आहे. म्हणजेच 2 लाखांच्या पुढे जर सोनं खरेदी केलं तर पॅन कार्ड देणं गरजेचं आहे.

 

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Remember these 5 things when buying gold
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भारतातील खास पर्यटन स्थळं फक्त एका क्लिकवर
भारतातील खास पर्यटन स्थळं फक्त एका...

मुंबई : दिवाळी, ख्रिसमस किंवा उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, फिरायलं

एनर्जी ड्रिंक्स आणि दारुचं मिश्रण प्राणघातक!
एनर्जी ड्रिंक्स आणि दारुचं मिश्रण...

हैदराबाद : एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी डॅमेज होण्याची आणि ब्लड

उल्हासनगरातील जीन्स कारखान्यांवर बंदीची टांगती तलवार
उल्हासनगरातील जीन्स कारखान्यांवर...

मुंबई: उल्हासनगरातील 511 जीन्स कारखान्यांवर बंदीची टांगती तलवार आहे.

VIDEO: पेट्रोलचं व्यसन लागलेलं माकड
VIDEO: पेट्रोलचं व्यसन लागलेलं माकड

नवी दिल्ली:  माकडांच्या वेगवेगळ्या कला  किंवा त्यांनी केलेल्या

२०१८ सालात सुट्ट्यांचा पाऊस, वर्षभरात १० वेळा सलग सुटट्यांचा योग
२०१८ सालात सुट्ट्यांचा पाऊस,...

मुंबई : 2018 वर्षात कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी

दिल्लीत 800 किलो तर नागपुरात 500 किलो खिचडी शिजली
दिल्लीत 800 किलो तर नागपुरात 500 किलो...

नवी दिल्ली: दिल्लीत सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया

इंग्लिश बोलताना आणि लिहिताना हमखास होणाऱ्या दहा चुका!
इंग्लिश बोलताना आणि लिहिताना हमखास...

मुंबई : आपण आपल्या मातृभाषेत उत्तम संवाद साधतो. पण दुसऱ्या भाषेत

22 पेटत्या मेणबत्या तोंडात धरुन शिक्षकाचा नवा विक्रम
22 पेटत्या मेणबत्या तोंडात धरुन...

मुंबई : मुंबईमधील दिनेश उपाध्याय या शिक्षकाने 22 पेटत्या मेणबत्या

मुंबईकर जगात सर्वाधिक तणावग्रस्त, स्ट्रेस दूर करण्यासाठी टिप्स
मुंबईकर जगात सर्वाधिक तणावग्रस्त,...

मुंबई : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन

मच्छर चावल्यास हा इलेक्ट्रॉनिक पेन वापरा!
मच्छर चावल्यास हा इलेक्ट्रॉनिक पेन...

मुंबई : मच्छर चावल्यानंतर अनेकदा आपल्या त्वचेवर पुरळ उठतात किंवा