यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 45 टक्के घट होण्याची शक्यता

असोचॅम-सोशल फाऊंडेशनने याबाबतचा सर्वे केला असून, सर्वेक्षणानंतर यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 45 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 10 October 2017 12:06 PM
sale of chinese goods may drop on this diwali says assocham foundation

नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असोचॅम-सोशल फाऊंडेशनने याबाबतचा सर्वे केला असून, सर्वेक्षणानंतर यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 45 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संस्थेच्या वतीने अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, जयपूर, लखनऊ आणि मुंबई आदी शहरांमध्ये सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये चिनी उत्पादनांच्या मागणीचं मुल्यांकन केलं गेलं.

या मुल्यांकनानंतर, यंदाच्या दिवाळीत चिनी मालाच्या विक्रीत 40 ते 45 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चिनी वस्तूंमध्ये फॅन्सी लायटिंग, लॅम्पशेड, लक्ष्मी-गणपतीची मूर्ती, रांगोळी, फटाके आदींचा समावेश आहे.

सर्वेक्षणानुसार, यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या तुलनेत, भारतीय उत्पादनांना ग्राहकांकडून जास्त पसंती मिळत आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या दिवाळीत चिनी उत्पादनांच्या विक्रीत 30 टक्क्यांची घट झाली होती. यंदा 45 टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, भारतीयांमध्ये चीन विरुद्धचा वाढता असंतोष स्पष्ट होत आहे.

सूचना : सर्वेक्षणातील दाव्यांची एबीपी माझाने पडताळणी केलेली नाही.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sale of chinese goods may drop on this diwali says assocham foundation
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सोनं खरेदीवेळी या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
सोनं खरेदीवेळी या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची

मुंबईकर जगात सर्वाधिक तणावग्रस्त, स्ट्रेस दूर करण्यासाठी टिप्स
मुंबईकर जगात सर्वाधिक तणावग्रस्त, स्ट्रेस दूर करण्यासाठी टिप्स

मुंबई : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन

मच्छर चावल्यास हा इलेक्ट्रॉनिक पेन वापरा!
मच्छर चावल्यास हा इलेक्ट्रॉनिक पेन वापरा!

मुंबई : मच्छर चावल्यानंतर अनेकदा आपल्या त्वचेवर पुरळ उठतात किंवा

मुंबईकर सर्वात जास्त तणावाखाली : सर्व्हे
मुंबईकर सर्वात जास्त तणावाखाली : सर्व्हे

नवी दिल्ली : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के मुंबईकर तणावाखाली

आता अश्रूंपासूनही वीज निर्मिती होणार?
आता अश्रूंपासूनही वीज निर्मिती होणार?

लंडन : अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी आता एक नवीन शोध लावला असून, यात

सलूनमध्ये मान मोडण्याचा मसाज महागात, मानेच्या शिरांना लकवा
सलूनमध्ये मान मोडण्याचा मसाज महागात, मानेच्या शिरांना लकवा

नवी दिल्ली: केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेल्यानंतर, अनेकवेळा

कॅन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार
कॅन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार

मुंबई : कॅन्सरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!

नवी दिल्ली : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया

आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती
आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती

मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा