आता अश्रूंपासूनही वीज निर्मिती होणार?

अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी आता एक नवीन शोध लावला असून, यात त्यांनी चक्क अश्रूंपासून वीज निर्मिती करणं शक्य असल्याचा दावा केला आहे.

आता अश्रूंपासूनही वीज निर्मिती होणार?

लंडन : अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी आता एक नवीन शोध लावला असून, यात त्यांनी चक्क अश्रूंपासून वीज निर्मिती करणं शक्य असल्याचा दावा केला आहे. वैज्ञानिकांच्या मते, अंड्यांचा पांढरा भाग, अश्रू, लाळ आणि सस्तन प्राण्यांचं दूध आदींच्या मिश्रणातून तयार होण्याऱ्या प्रोटीनमधून वीज निर्मिती करता येऊ शकते.

आयरलँडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ लायमरिक (UAL) च्या संशोधकांनी याबाबतचा रिसर्च केला आहे. या संशोधनादरम्यान प्रोटीनचा हा प्रकार म्हणजेच लायसोजाइमच्या क्रिस्टलवर दबावाने वीज निर्मिती करता येऊ शकते, असं वैज्ञानिकांनी  म्हटलं आहे.

दबाव निर्माण करुन उत्पादित विजेची क्षमता पायजोइलेक्ट्रिसिटीच्या नावाने ओळखली जाते. हा एक स्पटिक पदार्थ असून, या माध्यमातून यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत आणि विद्युत ऊर्जेचं यांत्रिकी ऊर्जेत रुपांतर केलं जाऊ शकतं.

संशोधकांच्या मते, लायसोजोमचे क्रिस्टल नैसर्गिक साधनांनी सहज प्रकारे तयार करता येऊ शकतं. यावर अजून सखोल संधोधन सुरु असून, याचा प्रयोग मोठ्या प्रमाणावरही करता येऊ शकतो, असाही दावा संशोधकांनी केला आहे.

आयरलँडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ लायमरिक (UAL) च्या संशोधकांचा हा शोध अप्लायड फिजिक्स लॅटर्समध्ये प्रकाशित झाला आहे.

सुचना : संशोधकांच्या या दाव्याची सत्यता एबीपी माझाने पडताळणी केली नाही.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV