मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन ते चार वर्षे स्त्रियांच्या शरीरात बदलाला सुरुवात होते. हे बदल मानसिक आणि शारीरिक दोन्ही असतात. याला 'प्र‌ीमेनोपॉज' असं म्हणतात. रजोनिवृत्तीनंतर काळ म्हणजे 'पोस्ट मेनोपॉजल'. भारतात साधारणत: ४० ते ५० वयोगटात रजोनिवृत्ती होते.

त्यामुळे रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी, जेणेकरुन महिलांचा त्रास कमी होईल.

 • रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनल बदल होत असल्याने शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे या काळात महिलांना अनेक आजार होतात. • या काळात अर्जुन काढा खूप फायदेशीर ठरतो. रोज सकाळी रिकाम्यापोटी आणि झोपण्यापूर्वी अर्जुन काढा प्यावा. रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या आजारांवर हा उत्तम उपाय आहे. • संधीवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, हात-पाय दुखणं असे त्रास होत असतील, तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात किंवा दुधात तूप घालून ते प्यायल्याने आराम मिळतो. • रजोनिवृत्तीच्या काळात स्थूलता वाढत असल्यास लसूण खाणं फायदेशीर ठरतं. रोज सकाळी उठल्यानंतर 2 ते 3 पाकळ्या लसूण चावून खाल्ल्याने फायदा होतो. • यासोबत तुळशीची पानं ताकासोबत घेतल्याने स्थूलता कमी होण्यासाठी मदत होते. आहारात तूप, लिंबू, मध, कांदा, टोमॅटो या पदार्थांचा समावेश करावा. • रजोनिवृत्तीच्या काळात मधुमेह, हृदयविकार, रक्तादाबाचा त्रास वाढतो. यावेळी कांदा, लसूण, टोमॅटो, मेथी, आवळा, बदाम या पदार्थांचा आहारात समावेश करावा • हृदयविकार असल्यास 8 ते 10 तुळशीची पानं आणि 2 ते 4 काळी मिरी चावून खावीत. त्यासोबत मधामध्ये लिंबू रस मिसळून घेतल्यानेही आराम मिळतो. • हार्मोनल बदलांमुळे त्वचेचे आणि केसांचे अनेक त्रास महिलांना होतात. त्वचा कोरडी होणे, खाज येणे, केस गळणे असे त्रास होत असल्यास, आहारात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि झिंकचा समावेश करावा. • दोन अंड्यांमध्ये चार चमचे ऑलिव्ह ऑईल घालून ते केसांना लावून केस धुवावेत. केस गळण्याच्या समस्येवर हा उत्तम उपाय ठरतो. • रजोनिवृत्तीच्या काळात अशक्तपणा वाढतो किंवा सारखी धाप लागते. अशावेळी लिंबूपाणी, मोसंबीचा रस, गाजराचा रस प्यावा. रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ल्यानेही आराम मिळतो. • रजोनिवृत्तीचा आणि इतर कोणत्याही गोष्टीचा ताण घेतला नाही तर अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं. मन शांत राहण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याकडे भर द्यावा. • रजोनिवृत्तीच्या काळात घाबरुन जाऊ नका. घरच्यांनीही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या काळात समजून घेणं गरजेचं आहे.


 

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV