टिप्स : पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या?

चहा-कॉफी पिण्याआधी थोडा वेळ पाणी प्यावं, त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

टिप्स : पाणी पिण्याच्या योग्य वेळा कोणत्या?

मुंबई : निरोगी शरीरासाठी पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. पण पाणी किती प्यावं, यासोबतच पाणी कधी प्यावं, याचेही नियम आहेत. पाणी ठराविक वेळेत प्यायलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. तसंच अनेक त्रासापासून सुटकाही होते.

निरोगी राहण्यासाठी पाणी कधी प्यावं?

- सकाळी उपाशीपोटी दोन ते तीन ग्लास पाणी प्यावं.

- या पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्यायल्यानेही फायदा होतो. हे पाणी प्यायल्यानंतर एक तास नाश्ता करणं टाळावं.

- हे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होईल तसंच पचनशक्ती सुधारुन पोट देखील साफ होईल.

- व्यायाम करण्याच्या दहा मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्यावं, यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होईल. व्यायाम करुन झाल्यानंतर 20 मिनिटांनी पाणी प्याव

- आंघोळीच्या काही वेळआधी पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

- जेवणाआधी पाऊण तास पाणी प्यायल्याने अॅसिडिटी किंवा अपचनाचे त्रास होत नाहीत, पण जेवताना पाणी पिणं टाळावं.

- झोपण्याच्या अर्धा ते एक तास आधी पाणी प्यायल्याने हार्टअटॅक किंवा स्ट्रोकपासून रक्षण होतं.

- योग्य वेळी पाणी प्यायल्याने वात, पित्त आणि कफ यांचा समतोल राहतो.

- यासोबत योग्यप्रकारे पाणी प्यायल्याने मेंदूचं कार्य सुरळीत होईल, त्वचा तजेलदार होण्यास मदत होतं आणि वजन नियंत्रणात राहतं.

घे भरारी शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tips : Benefits of drinking water at the correct time
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV