... म्हणून उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर टाळा!

... म्हणून उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर टाळा!

नवी दिल्ली : उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर सर्वाधिक होतो. यामुळे तुमची त्वचा कोमल राहते. पण याच्या अतिरिक्त वापरामुळे तुमच्या शरिरातील 'ड' जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी होतं. यामुळे स्नायू कमजोर होऊन, हाडे मोडण्याची शक्यता जास्त असते.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील टोरो विद्यापीठात याबाबतचं संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनावेळी सनस्क्रीनचा वापर करणाऱ्या तब्बल 1 अब्ज नागरिकांमधील 'ड' जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संशोधनकर्ता किम यांनी सांगितलं की, ''उन्हाळ्यात जेव्हा सर्वजण बाहेर पडतात, तेव्हा त्यातील काहीजण विशेष करुन स्त्रिया हटकून सनस्क्रीनचा वापर करतात. पण यातून ते आपल्या शरिरात 'ड' जीवनसत्त्व तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करतात. कारण, उन्हामुळे त्यांच्या शरिरातील 'ड' जीवनसत्त्व वाढते. तसेच स्नायूही बळकट होतात. त्यामुळे हाडे मोडण्याचे धोके उद्भवत नाहीत. त्यामुळे कोवळ्या उन्हात फिरताना सनस्क्रीनचा वापर टाळला पाहिजे, जेणेकरुन शरिरात 'ड' जीवनसत्त्व निर्माण होण्यास मदत होईल.''

या संशोधनानुसार, सनस्क्रीनच्या वापरातून मधूमेह,  गुडघे दुखीसारखे आजार संभवतात. 'ड' जीवनसत्त्व शरिरातल्या सर्व भागांना महत्त्वाचं आहे. तसेच रोगप्रतिबंधाची क्षमता वाढवण्यासाठीही ते गरजेचं असतं.

शरिरातील 'ड' जीवनसत्त्वाचं प्रमाण कायम राखण्यासाठी आठवड्यातून दोनवेळा तरी दुपारच्या वेळेस पाच ते 30 मिनिटांपर्यंत उन्हात फिरण्याचा सल्ला संशोधनकर्त्यांनी दिला आहे. तसेच यावेळी सनस्क्रीनचा वापर टाळण्याच्या सूचनाही शोधकर्त्यांनी दिल्या आहेत.  विशेष म्हणजे, एसपीएफयुक्त सनस्क्रीनचा वापर कटाक्षाने टाळण्यासही त्यांनी सांगितलं आहे. कारण यामध्ये ड जीवनसत्त्व नष्ट करण्याची क्षमता 99 टक्के असते.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV