फेसबुकवर सतत पोस्ट टाकणं आणि अन्य पोस्ट लाईक करणं आरोग्यासाठी घातक

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 6 February 2017 10:32 AM
फेसबुकवर सतत पोस्ट टाकणं आणि अन्य पोस्ट लाईक करणं आरोग्यासाठी घातक

मुंबई : फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणं आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणं या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. कॅलिफोर्निया विद्यापीठानं यासंबंधी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या अभ्यासासाठी सरासरी 48 वर्षांच्या 5200 लोकांचा अभ्यास करण्यात आला.

कॅलिफोर्निया विद्यापीठानं केलेल्या या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन 1 ते 4 मध्ये नोंदवलं. तर लाईफ सॅटिस्फॅक्शन 1 ते 10 मध्ये नोंदवलं. तसंच बॉडी मास इंडेक्सचीही माहिती दिली. या संशोधनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांचा फेसबुकचा डेटा वापरण्याची परवानगीही संशोधकांना दिली होती.

यामुळे संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याच्या सवयी आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याची सवय याचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करता आला. या संशोधनात सतत फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं आणि इतरांच्य़ा पोस्ट लाईक करणं यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो असा निष्कर्ष काढण्यात आला.

First Published: Sunday, 5 February 2017 9:38 PM

Related Stories

रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?
रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?

 मुंबई: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग

फक्त 4 मिनिटं सायकल चालवा आणि फिट राहा !
फक्त 4 मिनिटं सायकल चालवा आणि फिट राहा !

नवी दिल्ली : सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष

गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची मोठी झीज
गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची मोठी झीज

पणजी : गोव्यातील समुद्र किनारे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी.

हात धुण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरणे धोकादायक
हात धुण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरणे धोकादायक

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्ड

56 तास आणि 60 डॉक्टर, जगातली सर्वात मोठी फेस ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया
56 तास आणि 60 डॉक्टर, जगातली सर्वात मोठी फेस ट्रान्सप्लांट...

नवी दिल्ली: अमेरिकेतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जून महिन्यात जगातली

ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !
ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !

नवी दिल्ली : तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते? काळजी करु नका. अनेकांना

ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!
ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!

मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी 59 टक्के यूझर्स, जे ऑनलाईन डेटिंग

भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!
भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!

मुंबई : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला भारतीयांकडून हनिमून