'व्हॅलेंटाईन डे'ला सरप्राईज गिफ्ट देण्याचे पर्याय

आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येक जण काही खास ऑप्शन निवडताना दिसतो. ऑनलाईन शॉपिंग मार्केटमध्ये ट्रेण्डिंग असलेल्या काही भेटवस्तूंचा आढावा

'व्हॅलेंटाईन डे'ला सरप्राईज गिफ्ट देण्याचे पर्याय

मुंबई : फेब्रुवारी महिना म्हटला, की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो व्हॅलेंटाईन डे.  प्रेमी युगुल आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करताना दिसतात. कोणी कविता करतं, कोण रोमँटिक गाणं गाऊन आपलं प्रेम व्यक्त करतं.

आजची युवा पिढी ही डिजिटल पर्वाकडे वळत चालली आहे. प्रत्यक्षात दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी ऑनलाईन खरेदीकडे आजच्या तरुणांचा कल दिसतो. आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रत्येक जण काही खास ऑप्शन निवडताना दिसतो. ऑनलाईन जगतातील काही ट्रेंडिंग गोष्टींचा आढावा

अनबॉक्स हर :

या संकल्पनेतच सर्व काही दडलेलं आहे. क्लासी गॉगल्स, स्टायलिश टॉपवेयर, वेगवेगळ्या अॅक्सेसरीज आणि एक छानसं ग्रीटिंग कार्ड! दरवेळी आपल्याला या सर्व गोष्टी घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं, पण 'स्टाईलक्रॅकर'च्या बॉक्समध्ये आपल्याला हव्या त्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. प्रेयसीला एका रोमॅन्टिक डेटवर घेऊन जाण्याआधी तिच्यासाठी हा प्रेमाचा बॉक्स एक परफेक्ट गिफ्ट ठरु शकतं

Valentines Day Gift unbox her

ट्रॅडीशनल कुर्तीज :

काही मुलांना आपल्या प्रेयसीला वेस्टर्न कपड्यांपेक्षा ट्रॅडिशनल पोशाखात पाहायला आवडतं. अनेक तरुणी आपल्या प्रियकराला खुश करण्यासाठी ट्रॅडिशनल पोशाख घालण्यास पसंती देतात. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच ऑनलाईन बाजारात सध्या 'श्री कुर्ती' ट्रेंड होत आहे. यासाठी वापरला जाणारं कापड म्हणजे लिवा फॅब्रिक. हे फॅब्रिक अत्यंत मऊ आणि हलकं असल्यामुळे त्या कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय लिवाचं कापड हे 100 टक्के नैसर्गिक पद्धतीचं असतं.

Valentines Day Gift traditional kurti

हवामानातील बदल लक्षात घेता हलक्या आणि कम्फर्टेबल कुर्त्यांना प्राधान्य मिळताना दिसत आहे. ट्रॅडिशनल कुर्त्यांवर हेवी इअर रिंग्स आणि सॉफ्ट मेकअप तुम्हाला एक स्पेशल लूक देतो.

झोला बॅग्ज :

तरुणींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असते ती बॅग! आपली बॅग सर्वांपेक्षा हटके असावी, असा प्रत्येकीचा अट्टाहास असतो. झोला बॅग्ज या सध्या फॅशनमध्ये असल्यामुळे ज्या तरुणांना त्यांच्या प्रेयसीला व्हॅलेंटाईन डे ला खुश करायचं असेल, त्यांना ऑनलाईन शॉपिंगमध्ये झोला बॅग्जचा ऑप्शन फायदेशीर ठरु शकतो.

Valentines Day Gift Zola Bag

स्टायलिश अटायर :

सर्वांनाच हल्ली लेटेस्ट ट्रेंडनुसार आपलं फॅशन स्टेटमेंट बदलावंसं वाटतं. इंडो वेस्टर्न हा एक भन्नाट ऑप्शन सध्या ट्रेंड होताना दिसत आहे. धोती पँट्स, खादी कुर्ता आणि त्यावर जंक ज्वेलरी अशा क्लासी लूकमध्ये सध्याची तरुणाई वावरताना दिसते. सध्या स्टाईल मध्ये इन असलेली फॅशन म्हणजे कलर डेनिम. स्पायकर इंडियाची स्टयलिश ब्लू आणि ग्रे कलर डेनिम ही आजच्या जनरेशनमध्ये सर्वांचं स्टाईल स्टेटमेंट ठरली आहे.

Valentines Day Gift Jeans

तरुणींना हा ऑप्शन देसी आणि वेस्टर्न लूकसाठी साजेसा आहे. कलर डेनिमसोबत वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही स्टाईलमध्ये प्रयोग करु शकतो. हा लूक नक्कीच तुमच्या व्हॅलेंटाईन डेट साठी एक हटके पर्याय ठरु शकतो.

लॉंग ड्रेसेस :

सध्या लॉंग ड्रेसेसची क्रेझ सर्व वयोगटातील महिलांमध्ये दिसते. यामध्ये फ्लोरल प्रिंट, चेक्स, स्ट्रेट फिट असे अनेक ऑप्शन ऑनलाईन उपलब्ध असतात. तरुणींसाठी एखादा शॉर्ट ड्रेस हा पूर्णपणे वेस्टर्न असतो मात्र फ्लोरल प्रिंटचा लॉंग ड्रेस कोणत्याही ओकेजनला उत्तम दिसू शकतो. त्यावर साजेशी ज्वेलरी निवडल्यास ही अतिशय कम्फर्टेबल स्टाईल आहे.

Valentines Day Gift Long dress

ऑल टाइम बेस्ट साडी :

साडी हा प्रत्येक मुलीचा वीक पॉईंट. वेस्टर्न लूकसोबत सध्या साडीलाही तितकीच पसंती दिली जाते. ऑफिस, पार्टी किंवा कोणत्याही खास ओकेजनला साडी हा ऑप्शन तरुणींसाठी नेहमीच एक "वॅलीड ऑप्शन" असतो. लिवा फॅब्रिक असलेल्या साड्या या ऑनलाईन मार्केटमध्ये आपल्या खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहेत. लाल, पांढरा, हलका पिवळा, निऑन ग्रीन, बेबी पिंक अशा फ्रेश कलरच्या साड्या बेस्ट गिफ्ट ऑप्शन ठरु शकतात.

Valentines Day Gift Saree

आपल्या व्हॅलेंटाईनला खुश करायचं असेल तर खिशाला परवडणारे यासारखे ट्रेंडिंग ऑप्शन नक्कीच तुमचा प्रेमाचा दिवस आणखीनच स्पेशल करु शकतात.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Valentines Day surprise gift for girlfriend latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV