रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?

रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?

 मुंबई: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग एक उत्तम उपाय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र धावताना तुम्ही काही चुका केल्या, तर त्याच्या तोट्यांनाही सामोरं जावं लागतं.

रनिंग-जॉगिंगवेळी काय काय काळजी घ्यावी?

स्ट्रेचिंग -

संशोधनानुसार स्ट्रेचिंग हे धावणाऱ्यांसाठी योग्य नाही. साधं-सोपं बसून स्ट्रेचिंगही तुमची क्षमता कमी करु शकतं. स्ट्रेचिंगमुळे स्नायू आणि मेंदू दरम्यानच्या वहनावर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंची क्षमता आणि शक्ती कमी होते.

खूप खाऊ नये

रनिंग आणि जॉगिंगपूर्वी खूप काही खाऊ नये. पोटभर खाऊन धावल्याने पचनक्रियेवर आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

खूप पाणी किंवा काहीच पाणी न पिणे

धावण्यापूर्वी खूप पाणी पिणे किंवा काहीच पाणी न पिणे हे धोकादायक आहे. धावण्यापूर्वी/धावताना थोडंस पाणी प्यावं.

फ्रेश न होणं

काही लोक रनिंग किंवा जॉगिंगला जाण्यापूर्वी फ्रेश होत नाहीत, टॉयलेटला जात नाहीत. मात्र त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. लघवी किंवा संडासला न जाता व्यायाम करणं चुकीचं आहे.

शरिराविरोधात कृती करु नये

जर तुम्हाला धावताना शरिराची साथ मिळत नसेल, तर विनाकारण जबरदस्तीने धावू नका. शक्य होईल तितकंच धावावं. याऊलट जबरदस्तीने धावल्यास तुम्ही त्वरीत थकू शकता, तसंच तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: running
First Published:
LiveTV