बीडमध्ये बारावीच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक

1199 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने आता शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये बारावीच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक

बीड : केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक झाल्या आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

केज शहरातील गट साधन केंद्रात आज संध्याकाळी आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.

आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

1199 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने आता शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात  कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 1199 answer sheets burnt in Beed
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV