लग्नाच्या वादातून तरुणीची चाकू भोसकून हत्या

अमरावतीमधील साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत प्रतिक्षा म्हेत्रे या २४ वर्षीय तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे.

लग्नाच्या वादातून तरुणीची चाकू भोसकून हत्या

अमरावती : अमरावतीमधील साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत प्रतिक्षा म्हेत्रे या २४ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. प्रतिक्षाचा लग्नावरून एका मुलाशी वाद होता.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्षा बुधवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिक्षाची तक्रार नोंदवून घेतली नाही. याच वादातून आरोपीनं प्रतिक्षावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज (गुरुवार) संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणात दोन हल्लेखोर आहेत. यातील एकाचं नाव राहुल भड असल्याचं समजतं आहे. दोन्ही आरोपी फरार झाले असून सध्या पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, हल्ला झाला त्यावेळी प्रतिक्षाची एक मैत्रीण तिच्या सोबत होती. मात्र, त्या मैत्रिणीचा पती या प्रकरणात पडण्यास मज्जाव करत असल्याचं समजतं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 24 year old girl murder in Amravati latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV