पालघरमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू, 14 जखमी

पालघरमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

पालघरमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू, 14 जखमी

पालघर : पालघरमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

तसेच यामुळे काही जनावरंही जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी घरांवरची छप्परंही उडाली आहेत. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भातशेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, दुपारपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे. मुंबई, नवी मुंबईसह, रायगड आणि पालघर, वसई-विरारमध्ये तुफान पाऊस सुरु आहे.

रायगडच्या महाड, खोपोली, पाली भागातही विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV