मराठा मोर्चातून परतताना 5 जणांचा अपघाती मृत्यू

मुंबईतील मराठा मोर्चात सहभागी होऊन घरी परतणाऱ्या 5 जणांचा अपघाती मृत्यू झाला.

5 Maratha morcha supporters died in accident

मुंबई: मुंबईतील मराठा मोर्चात सहभागी होऊन घरी परतणाऱ्या 5 जणांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबईतील वडाळ्यात काल संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला.

तर तिकडे येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. याच अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे हे सातही जण मुंबईतला कालच्या मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला. हा अपघात खामगाव पाटीजवळ झाला, ज्यात  तिघांनी आपला जीव गमावला.

मराठा मोर्चातून परतताना बाईकला ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

मुंबईत मराठा मोर्चा

देशाची आर्थिक राजधानी मराठा मोर्चामुळे भगवी झाली आणि त्याचा परिणामही अवघ्या काही तासात दिसून आला. भायखळा ते आझाद मैदानादरम्यान लाखोंच्या मराठा समाजानं केलेल्या मूक मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षण, शिक्षण आणि इतर मागण्यांवर महत्वाच्या घोषणा केल्या.

त्यानुसार कोपर्डीचं प्रकरण कोर्टात अंतिम टप्प्यात आहे, त्याचा निकाल लवकरच लागेल.

आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाच्या कोर्टात आहे, त्यांनी ते कालमर्यादेत पूर्ण करावं अशी विनंती आपण करु. तसंच ओबीसींना 605 अभ्यासक्रमात मिळणाऱ्या सवलती मराठा आणि मुस्लिम समाजालाही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

  • कोपर्डी प्रकरण अंतिम टप्प्यात, लवकरच निकाल लागेल
  • आरक्षण प्रकरणी मागासवर्गीय आयोग कालमर्यादेत काम पूर्ण करेल
  • 605 अभ्यासक्रमात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  • मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणेच 50 टक्के गुणांची मर्यादा राहील
  • प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांची स्वतंत्र वसतिगृह उभारणार
  • वसतिगृह उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 कोटी रुपयाचा निधी

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप 

मराठा मोर्चा : मागण्या काय आणि मिळालं काय?

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:5 Maratha morcha supporters died in accident
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत
पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत

जालना : जालन्यात एक-दोन नाही, तर तब्बल पाच मुन्नाभाईंना भरारी पथकाने

'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना
'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी

मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद : मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी

ऐन सणासुदीत राज्यातील 49 हजार रेशन दुकानं बंद
ऐन सणासुदीत राज्यातील 49 हजार रेशन दुकानं बंद

रत्नागिरी: सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यातील 49

अनैतिक संबंधांना अडसर ठरल्याने पतीकडून पत्नीची हत्या
अनैतिक संबंधांना अडसर ठरल्याने पतीकडून पत्नीची हत्या

सोलापूर : सोलापूरमध्ये अनैतिक संबंधांच्या अडसर ठरल्याने, पतीनं

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज
राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

मुंबई: येत्या तीनदिवसात  राज्यात मुसळधार पावसाची एण्ट्री होईल, असा

मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गोकुळ

पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू
पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू

पालघर : पालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून 21 वर्षीय गोविंदाचा

नगरमधील विखे पाटील संकुलात 150 फूट उंच ध्वज
नगरमधील विखे पाटील संकुलात 150 फूट उंच ध्वज

अहदमनगर : अहमदनगरला विळद घाटात विखे पाटील शैक्षणिक संकुलात 150 फूट

बारामतीत गणवेशासाठी विद्यार्थ्यांचं ‘बोंबाबोंब’ आंदोलन
बारामतीत गणवेशासाठी विद्यार्थ्यांचं ‘बोंबाबोंब’ आंदोलन

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने