आटपाडीत 8 वर्षीय मुलीचे मारेकरी आठवडा उलटूनही मोकाट

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गळवेवाडीमधील ही घटना आहे.

आटपाडीत 8 वर्षीय मुलीचे मारेकरी आठवडा उलटूनही मोकाट

सांगली : 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना घडून आठवडा उलटून गेला तरी अजून आरोपी मोकाट आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गळवेवाडीमधील ही घटना आहे.

या चिमुकलीच्या मारेकऱ्यांचा शोध लावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आटपाडी तालुक्यातील लोणारी समाजच्या वतीने देण्यात आला आहे. गळवेवाडीतील ही मुलगी रविवार दिनांक 7 जानेवारी 2018 रोजी गायब झाली होती. तिचा मृतदेह कुटुंबीयांना सोमवार दि. 8 जानेवारी 2018 रोजी गळवेवाडीमधील घराजवळील एका पडक्या विहिरीत आढळून आला होता.

यात तिच्याच पायजम्याने तिच्या गळ्याभोवती फास आवळून तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. ही मुलगी आपल्या आजोळी आजीकडे राहत होती.

मुलीची हत्या लैंगिक अत्याचार करून केली असण्याची शक्यता आहे. तिच्या अंगावर इतरत्रही संशयास्पद जखमा होत्या. या अमानवी कृत्याचा तपास करून दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करू, असं सांगितलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 8 years old girl sexual harassment and murder Accused are not arrested yet
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV