पंजाबराव देशमुख अर्बन बँकेला तब्बल 9 कोटींचा गंडा, 35 जणांवर गुन्हे दाखल

पंजाबराव अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेला 9 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तत्कालिन बँक मॅनेजर आणि महाराष्ट्र वखार महामंडळाच्या भांडार अधीक्षकांचाही समावेश आहे.

पंजाबराव देशमुख अर्बन बँकेला तब्बल 9 कोटींचा गंडा, 35 जणांवर गुन्हे दाखल

वर्धा : वर्ध्याच्या पंजाबराव अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेला 9 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तत्कालिन बँक मॅनेजर आणि महाराष्ट्र वखार महामंडळाच्या भांडार अधीक्षकांचाही समावेश आहे.

वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये धान्य साठवून त्या पावतीच्या आधारावर बँकेकडून कर्ज उचलण्यात आलं. मात्र, साफसफाईच्या नावाखाली 70 टक्के धान्यसाठा गोडाऊनमधून हलवण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे.

हा प्रकार उघडकीस झाल्यानंतर बँकेचे निलंबित मॅनेजर अशोक झाडे एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी एबीपी मझाशी बोलताना दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी संजय वानखेडे यांनी आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येमागे हेच प्रकरण कारणीभूत होतं का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV