औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद-पैठण रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.

औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. नाजिम शेख असं मृत युवकाचं नाव आहे.

हा अपघात एवढा भयानक होता की दुचाकीवरील दोघे जण अक्षरश: हवेत फेकल्या गेले. या अपघातात नाजिमचा जागीच मृत्यू झाला. नाजिम आणि सलमान हे दोघे जण दुचाकीवरुन पैठणकडे निघाले होते. त्यावेळी राहुलनगर येथे दुचाकी आणि कारची समोरसमोर जोरदार धडक झाली.

नाजिमच्या दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने त्याला समोरुन येणाऱ्या कारचा अजिबात अंदाज आला नाही. त्यामुळे कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: A youth dies in road accident in Aurangabad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV