देशात चौथा, तर महाराष्ट्रात 'माझा' नंबर वन !

देशभरातील न्यूच चॅनेल्समध्ये सर्वाधिक व्हिडिओ पाहिले जाणाऱ्या फेसबुक पेजमध्ये एबीपी माझा चौथ्या क्रमांकावर आहे.

देशात चौथा, तर महाराष्ट्रात 'माझा' नंबर वन !

मुंबई : महाराष्ट्रात एबीपी माझा पुन्हा अव्वल क्रमांकावर कायम आहे. फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या देशभरातील न्यूज चॅनेलच्या फेसबुक पेजमध्ये, एबीपी माझा चौथ्या क्रमांकावर आहे. तर राज्यात आधापासूनच एबीपी माझा अव्वल स्थानावर कायम आहे.

सोशल व्हिडिओ इंटिलिजेन्स या सोशल मीडियावरील व्हिडिओची रँकिंग जारी करणाऱ्या एजन्सीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एबीपी माझाच्या पेजवर सप्टेंबर महिन्यात 14 कोटी 42 लाख 32 हजार 44 जणांनी व्हिडिओ पाहिले. तर एबीपी न्यूजने या यादीत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावलं. एबीपी लाईव्ह पाचव्या क्रमांकावर आहे.

एबीपी माझाचं फेसबुक पेज लाईक्सच्या बाबतीतही राज्यात अगोदरपासूनच अव्वल आहे. एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांनी फेसबुक पेज व्हिडिओमध्येही पहिलं स्थान कायम ठेवलं. एबीपी माझाच्या फेसबुक पेजला सध्या 35 लाख 31 हजार 833 लाईक्स आहेत.

एबीपी माझाच्या या कामगिरीमध्ये वाचक आणि प्रेक्षकांची साथ तर आहेच, शिवाय एबीपी माझाच्या डिजिटल टीमची मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे. एबीपी माझाच्या डिजिटल टीमकडून प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, बातमी आणि व्हिडिओ पॅकेज प्रेक्षकांपर्यंत क्षणाक्षणाच्या अपडेटसह पोहोचवले जातात.

एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही कामगिरी केली आहे. सर्व प्रेक्षक आणि वाचकांचे मनापासून आभार. प्रत्येक बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हीही https://www.facebook.com/abpmajha या पेजला भेट देऊ शकता.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha ranked fourth in country first in state in most facebook video views
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV