एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/12/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 08/12/2017*

 1. मोदी-फडणवीसांना अंगावर घेणाऱ्या नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा, भाजप सदस्यत्वही सोडलं,


सरकारने शेतकरी आणि सामान्य जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप  https://goo.gl/HyrrMn 

 1. नाना पटोले स्वगृही परतण्याची चिन्हं, काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि नाना पटोले यांची दिल्लीत बैठक https://gl/HyrrMn


 

 1. मुख्यमंत्री जवळच्याच लोकांच्या वाटेला जातात, पण त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, नाना पटोलेंचा फडणवीसांना सल्ला https://gl/WJk9VH


 

 1. नाक घासत सत्तेत 3 वर्षे घालवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंचा आदर्श घ्यावा, खिशातील राजीनाम्यावरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्ला, राणेंची आज कोल्हापुरात सभा http://abpmajha.abplive.in/


 

 1. महाराष्ट्रात 16 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार, मार्च 2018 पर्यंत राज्यभरात 27 पासपोर्ट केंद्र कार्यान्वित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा मानस https://goo.gl/jW2TQa


 

 1. 5 मंत्र्यांची भेट घेऊनही प्रश्न सुटला नाही, चार पत्रं लिहून वाशिमच्या शेतकऱ्याची आत्महत्या https://gl/FYCzXh तर लातूरमध्येही आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न फसल्यानंतर शेतकऱ्याने आयुष्य संपवलं


 

 1. खारघरमध्ये उद्यापर्यंत रिक्षा सुरु न केल्यास परवाने रद्द होणार, आंदोलनात सहभागी रिक्षाचालकांना इशारा, पोलीस आणि आरटीओची जोरदार मोहीम, 'माझा'च्या पाठपुराव्यानंतर कारवाईला सुरुवात http://abplive.in/live-tv


 

 1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना सात दिवसांची पोलीस कोठडी, बेपत्ता एपीआय अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी पनवेल कोर्टाचा निर्णय, भाईंदरमधल्या राहत्या घराचा रंग बदलल्यानं कुरुंदकर भोवती संशयाचं वलय


 

 1. पाकिस्तानात कैद असलेले कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार, पत्नी आणि आई 25 डिसेंबरला भेट घेणार https://gl/f5Fe43 


 

 1. लग्नानंतर महिलांना पतीचा धर्म स्वीकारण्याची सक्ती करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://gl/o7TDZ1 


 

 1. जिवंत मुलाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द, केजरीवाल सरकारचा मॅक्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा https://gl/86sNLx 


 

 1. नागपूर पोलिसांना जमत नसेल तर मुंबई पोलिसांना सांगा, ते मुन्ना यादवला अटक करतील, पोलिस महासंचालक सतीश माथुर यांचा घरचा आहेर https://gl/dLxkR1


 

 1. मोदी सोनियांना बार गर्ल म्हणाले होते, तेव्हा त्यांची भाषा चुकीची नव्हती का?, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा सवाल https://gl/dH1wH1 


 

 1. भाजप आमदार अनिल गोटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, स्वत:सह राधेश्याम मोपलवार, सतीश मांगलेंची ब्रेन मॅपिंग, नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी
 2. अभिनेत्री अनुष्का शर्मा सहकुटुंब इटलीला रवाना, हरिद्वारचे पुरोहित अनंत बाबाही सोबत,  विरानुष्काच्या लग्नाच्या चर्चांना उधाण https://gl/Cdmnas 


 

*एबीपी माझा आता Hotstar वर उपलब्ध* https://goo.gl/EZsgGL 

*BLOG* जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी – ‘द जे’... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे  यांचा ब्लॉग https://goo.gl/ifxxB5 

*माझा विशेष* : मणिशंकरांना धक्का, इतर वाचाळवीरांचं काय? आज रात्री 9.15 वाजता फक्त ‘एबीपी माझा’वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर *- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 08/12/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV