एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/01/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 02 Jan 2018 06:36 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/01/2018

 1. पुण्याजवळील सणसवाडीतील दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल, एका महिलेच्या तक्रारीनंतर अॅट्रॉसिटी, दंगल चिथावणी प्रकरणी गुन्हा https://goo.gl/efzck4


 

 1. भीमा-कोरेगावचे पडसाद मुंबईत, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर घाटकोपरजवळ आणि सायन पनवेल हायवेवर चेंबूर नाक्यावर वाहतुकीचा खोळंबा, हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द दरम्यान लोकल ठप्प https://goo.gl/rmQaGa


 

 1. भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप नेते प्रकाश आंबेडकरांकडून उद्या बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक, सूत्रधारांना अटक करण्याची मागणी https://goo.gl/9ZHkFN


 

 1. सणसवाडी दगडफेकीची मुख्य न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार https://goo.gl/So9snJ


 

 1. सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती, शरद पवारांचं वक्तव्य https://goo.gl/Vo2FCY घटनेला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी https://goo.gl/ga7Eo2


 

 1. नॅशनल मेडिकल काऊन्सिल विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवल्याने डॉक्टरांनी पुकारलेला ओपीडी संप मागे, रुग्णसेवा तात्काळ सुरु करण्याचं आयएमएचं आवाहन https://goo.gl/2ncNCX


 

 1. मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' देण्याचा प्रस्ताव विचाराधीन, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची संसदेत लेखी उत्तरात माहिती https://goo.gl/jTNLGQ


 

 1. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचं 'आधार'अस्त्र, सोनोग्राफीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याची तयारी https://goo.gl/CnQb2P


 

 1. कमला मिल्स कम्पाऊण्ड्सच्या आगीत अडकलेल्यांची धाडसाने सुटका करणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा पोलिस आयुक्तांकडून सत्कार, कॉन्स्टेबल शिंदेनी खांद्यावर उचलून नेत केली नऊ जणांची सुटका https://goo.gl/Q7tnW5


 

 1. रत्नागिरीचे सुपुत्र मेजर प्रसाद महाडिक चीनच्या सीमेवर शहीद, पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार https://goo.gl/wYagMt


 

 1. पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रकल्पासाठी 8 हजार 313 कोटींची तरतूद https://goo.gl/vuXPJS


 

 1. चंद्रपुरातील वरोऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे वीज उपकेंद्रात भीषण आग, आग आटोक्यात, मात्र 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प https://goo.gl/tXyboU


 

 1. लष्करात आहेत, तर जीव जाणारच, भाजप खासदार नेपाल सिंह यांच्या वक्तव्यामुळे वाद https://goo.gl/fQMLdD


 

 1. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, 225 मिलियन डॉलरची मदत रोखली https://goo.gl/hRYrQV


 

 1. पाकिस्तान हाफिज सईदच्या आर्थिक नाड्या आवळणार; संस्था, संपत्ती ताब्यात घेण्याच्या हालचाली https://goo.gl/Bva3LX


 

*BLOG* : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या चालू वर्तमानकाळ सदरातील नवा ब्लॉग, आनंदाची गोष्ट https://goo.gl/n82wfT

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 02 January 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV