एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/01/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 03 Jan 2018 06:58 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 03/01/2018

 1. भीमा कोरेगाव दगडफेकीच्या निषेधार्थ पुकारलेला राज्यव्यापी बंद अखेर मागे, भारीप बहुजन महासंघ प्रकाश आंबेडकरांची घोषणा, बंद शांततेत पार पडल्याचा दावा https://goo.gl/DKapsp


 

 1. आंदोलन शांत ठेवण्याची जबाबदारी एकट्याची नाही, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, बंददरम्यान राज्यभरात झालेल्या हिंसाचारातून हात झटकले https://goo.gl/DKapsp


 

 1. बंददरम्यान मुंबई आणि परिसरात तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून मुंबई पोलीस गुन्हे दाखल करणार, दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी कारवाई, रेल्वे पोलीसही गुन्हा दाखल करणार https://goo.gl/iPGqFu


 

 1. याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल केले होते, तेच गुन्हे भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी https://goo.gl/voDCcd


 

 1. महाराष्ट्र बंदनंतर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात, सोशल मीडियातून चुकीची माहिती पसरवणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांची माहिती https://goo.gl/Yy6BJD


 

 1. दोन्ही समाजात सलोखा राहावा, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा प्रयत्न करणार, दंगलीत मृत्यूमुखी दोन मराठा तरुणांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्याची मागणी https://goo.gl/iPGqFu


 

 1. महाराष्ट्र बंदनंतर मुंबईतील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, मेट्रो सेवा सुरु, रेल्वेसेवाही सुरळीत https://goo.gl/Yy6BJD


 

 1. बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यावर शुकशुकाट, पुण्यातही तणाव, नाशिक, नागपूरमध्ये जाळपोळ आणि बसेसवर दगडफेक https://goo.gl/Yy6BJD महाराष्ट्र बंदचा बॉलिवूडलाही फटका, मुंबईत शुटिंग रखडलं, थिएटर बंद झाल्यानं मोठं नुकसान  https://goo.gl/97eDqR


 

 1. राज्यातील आज होणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंगच्या सर्व परीक्षा रद्द, औरंगाबादच्या बामू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले https://goo.gl/PaEh21


 

 1. शिर्डीत शाळकरी मुलगी कालपासून बेपत्ता, भीमा कोरेगावातील तणावामुळे शाळा लवकर सुटली, मात्र चिमुकली अद्याप घरी परतलीच नाही https://goo.gl/5BL4SY


 

 1. पंतप्रधान मोदी मौनी बाबा बनून राहू शकत नाहीत, भीमा कोरेगावप्रकरणी पंतप्रधान मोदींनी निवेदन करावं, काँग्रेसची लोकसभेत मागणी https://goo.gl/y9HRsU


 

 1. भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटना, मायावतींचा आरोप, दोषींवर कडक कारवाई करण्याचीही मागणी https://goo.gl/n3sqJN


 

 1. समाज कंटकांना शिक्षा व्हायलाच हवी, खासदार संभाजीराजेंची मागणी, मूठभर कंटकांमुळे सामाजिक घडी विस्कटू न देण्याचं आवाहन https://goo.gl/Zj8WSY


 

 1. राज्यसभा उमेदवारीच्या शर्यतीमधून आशुतोष आणि कुमार विश्वास आऊट, आम आदमी पार्टीकडून एन.डी.गुप्ता, संजय सिंह आणि सुशील गुप्तांना संधी, आपमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हं https://goo.gl/WdtZ8H


 

 1. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली, उद्या शिक्षेची सुनावणी होणार https://goo.gl/5p7HKQ


 

*BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांच्या खादाडखाऊ सदरातील नवीन ब्लॉग, परफेक्ट दर्शन https://goo.gl/bM8RSj

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive  

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 03 January 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV