एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/11/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

By: | Last Updated: 15 Nov 2017 06:29 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/11/2017

 1. ऊस दरासाठी औरंगाबाद, अहमदनगर आणि सोलापुरात आंदोलन, आंदोलकांकडून ठिकठिकाणी दगडफेक करत हिंसक वळण, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर https://goo.gl/A5tN97


 

 1. भाजप प्रवेशासाठी चंद्रकांत पाटलांनी 5 कोटींची ऑफर दिली, शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधवांचा गौप्यस्फोट, भाजपकडून मात्र इन्कार https://goo.gl/yai8Lp


 

 1. नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक https://goo.gl/m59tmh तर काँग्रेससोबत चर्चा करुन भूमिका ठरवू, सुनील तटकरेंची माहिती https://goo.gl/Ejx1Bi


 

 1. कार अपघातातील जखमींच्या मदतीला खुद्द शरद पवार धावले, गडचिरोली दौऱ्यावेळी जखमींना सहकार्यासाठी पवारांचा पुढाकार https://goo.gl/Bsh2vK


 

 1. राज्यातील 107 सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून 10 हजार कोटींची तत्वतः मंजुरी, दिल्लीत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय https://goo.gl/7xa42n


 

 1. सेन्सॉर सर्टिफिकेट नसल्यानं इंडियन पॅनोरमातून 'न्यूड' वगळला, मनोहर पर्रिकरांचं स्पष्टीकऱण, 'न्यूड'वादावर एकजूट दाखवत मराठी चित्रपट दिग्दर्शकांकडून इफ्फीचा निषेध https://goo.gl/axmBWo


 

 1. राजपूत संघटनेपाठोपाठ आमदार राम कदमांचाही पद्मावती सिनेमाला विरोध, आक्षेपार्ह दृश्यं न वगळल्यास यापुढे कुठलंच शूटिंग करु न देण्याचा इशारा https://goo.gl/48YgPz


 

 1. नवी मुंबईतील कळंबोली पोलिस स्टेशनच्या एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, तपासास टाळाटाळ केल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यावर कुटुंबीयांचा संशय https://goo.gl/7nvUrw


 

 1. स्वत:चीच चिता रचून राहत्या घरात महिलेची आत्महत्या, कोल्हापुरातील बामणी गावामधील धक्कादायक प्रकार https://goo.gl/sAkQqG


 

 1. नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचा गुगलकडून सन्मान, भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कार्नेलिया सोराबजी यांना जयंतीदिनी डूडलद्वारे सलामी https://goo.gl/FVwKnA


 

 1. इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती, सुयश दीक्षित राजा, तर वडिलांना पंतप्रधानपद https://goo.gl/ZVnhGQ


 

 1. उत्तर प्रदेशमधील हिंदन एअरबेसमध्ये अवैध घुसखोरीचा प्रयत्न, संशयितावर सुरक्षा यंत्रणेचा गोळीबार https://goo.gl/774oXn


 

 1. अयोध्येतील राम मंदिरावर तोडगा निघण्याची शक्यता, श्री श्री रविशंकर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात चर्चा, सुन्नी बोर्डाच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/iCQ9Et


 

 1. UC ब्राऊजर गुगल प्ले स्टोअरवरुन रातोरात गायब, चुकीच्या पद्धतीने प्रमोशन केल्यामुळे कारवाईचा कर्मचाऱ्याचा दावा https://goo.gl/1QcCFP


 

 1. मी रोबो नाही, माणूस आहे, मलाही विश्रांतीची गरज, कॅप्टन कोहलीचं खेळाडूंच्या विश्रांतीवर भाष्य https://goo.gl/oX3ZdP


 

मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर यवतमाळमधील जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर

माझा विशेष : आमदारांना भाजप खरेदी करु पाहतंय का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 15 November 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV