एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2018

 

  1. अनेक राज्यात नोटांचा तुटवडा, ATM मध्ये खडखडाट, सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप https://goo.gl/jH33Fm बाजारात मुबलक चलन असल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा दावा


 

  1. चलनात दोन हजाराच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद, केंद्राची माहिती, 500 रुपयांच्या नोटांची छपाई पाचपट वाढवण्याचीही हमी https://goo.gl/xwgSz4


 

  1. संसदेत 15 मिनिटं द्या, मोदी उभे राहणार नाहीत, राहुल गांधींचं आव्हान, बँकिंग क्षेत्राचं वाटोळं केल्याचाही आरोप https://goo.gl/3drDeC


 

  1. एल्गार परिषदेनंतर कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर धाडी, नागपुरात नक्षलवाद्यांचे खटले लढणाऱ्या वकिलाच्या घरावर छापा https://goo.gl/RyYV6i एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेऊन धाडसत्र नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/CYDxcj


 

  1. राज्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी, मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात जोरदार गारपीट, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान https://goo.gl/29rbQJ


 

  1. बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच, या वर्षी तीन महिन्यात 696 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं https://goo.gl/VfUycG


 

  1. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हं, बारामतीतील विविध कार्यक्रमात आजोबा शरद पवारांसह हजेरी https://goo.gl/hUvBzj


 

  1. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून, कचरा वेचणाऱ्या महिला, अनाथ आणि शेतकऱ्यांना पहिल्या प्रवासाचा मान, विमानसेवा अखंडित राहण्यासाठी खासदार महाडिकांची पुढील सहा महिन्यांची तिकिटं घेण्याची तयारी https://goo.gl/jKmpPH


 

  1. अहमदनगरमध्ये अटकेत असलेले नगरसेवक कैलास गिरवलेंचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू, पोलिसांकडून मारहाणीचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/L4SVNQ


 

  1. औरंगाबादेत बसस्थानकावरील कचऱ्याच्या ढिगाला पुन्हा आग, कचऱ्याच्या प्रश्नावरुन औरंगाबादकर आक्रमक, महापालिकेच्याविरोधात गार्बेज वॉकचं आयोजन https://goo.gl/sJyoJZ


 

  1. राष्ट्रीय आरोग्य अभियान व्हेंटिलेटरवर, राज्यभरातील कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन https://goo.gl/WdWXoA


 

  1. दामदुप्पट योजनेचं आमिष, नाशकात अनेकांना कोट्यवधींचा गंडा, तीन संशयित अटकेत https://goo.gl/ohD4M4


 

  1. जीएसटीमुळे खादी उद्योग डबघाईला, देशातील 27 पैकी फक्त 9 खादी संस्था कार्यरत, सरकारचे दुर्लक्ष https://goo.gl/wWfizo


 

  1. मक्का मशीद बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर राजीनामा दिलेल्या न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईच्या भीतीने निवृत्तीच्या दोन महिने आधीच राजीनामा दिल्याचा वकिलाचा दावा https://goo.gl/5Py3g8


 

  1. देशातील 48 खासदार आणि 3 आमदारांवर महिलांसंबंधित गुन्हे, एडीआरच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर https://goo.gl/etAfLm


 

*माझा विशेष* : रोख पैशाचा ओघ का आटला? विशेष चर्चा, आज रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive  

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 17 April 2018 latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV