एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/12/2017

By: | Last Updated: 23 Dec 2017 06:38 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/12/2017

1. चारा घोटाळ्यात राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जण दोषी, तर 7 जणांची निर्दोष मुक्तता, 3 जानेवारीला शिक्षेची सुनावणी, https://goo.gl/HosXYg

2. पिवळ्या रेषेबाहेर वाहनं असतील तर टोल वसुली करणं चुकीचं, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण, टोल कंपन्यांकडून मनमानी वसुली सुरुच https://goo.gl/NTBtCw

3. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबईबाहेर जाणारे सगळे रस्ते ओव्हरफ्लो, एक्स्प्रेस वेवर 5 किमीच्या रांगा, अहमदाबाद आणि गोवा हायवेवरही प्रचंड ट्रॅफिक https://goo.gl/qru3Cy

4. राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये बस नदीत कोसळून तब्बल 32 प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती https://goo.gl/4dEJee

5. दोन हजाराची नोट बंद होणार ही अफवा, अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन https://goo.gl/tGdJQB

6. 'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येऊ नये?', युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ट्विटरवरुन सवाल http://abpmajha.abplive.in/live-tv

7. एकनाथ खडसेंवरील झोटिंग समिती अहवाल निरर्थक ठरवून 45 लाख वाया का घालवले?, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी https://goo.gl/6v3iXK

8. मुंबईत डबेवाल्यांच्या रोटी बँकेला माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांचा मदतीचा हात, शहरातील उरलेलं जेवण गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीन गाड्या डबेवाल्यांच्या दिमतीला https://goo.gl/FbuF3u

9. उडाण योजना सुरु झाल्यानंतरही कोल्हापूरकर जमिनीवरच, खेळण्यातील विमानं उडवून शिवसेनेचं आंदोलन, तर जळगाव आणि नाशिकमध्ये विमानांच्या वेळापत्रकावरुन संभ्रम कायम, नांदेड-अमृतसर विमान सेवेला सुरुवात https://goo.gl/jv17df

10. उस्मानाबादमध्ये महिलेची चपलांचा हार घालून धिंड, चहाड्या सांगितल्याच्या रागातून आरोपींचं धक्कादायक कृत्य, पोलिसात तक्रार दाखल https://goo.gl/1ZsdXq

11. वाघाला जेरबंद करुन दहशतीचं सावट दूर करणाऱ्या ‘मर्दानी’चं कौतुक, भंडाऱ्याच्या जंगलातून ‘माझा’चा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv

12. नाशिकच्या पळसे गावातून शिडीच्या मदतीनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं, बिबट्या बाहेर येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ, ‘माझा’च्या कॅमेऱ्यात दृश्यं कैद https://goo.gl/LCBkMZ

13. सलमानच्या 'टायगर जिंदा है'ची पहिल्या दिवशी बंपर कमाई, बॉक्स ऑफिसवर 33.75 कोटींचा गल्ला https://goo.gl/p1Tqde

14. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, उपांत्य फेरीत गतउपविजेता अभिजीत कटकेचा सामना निलेश लोखंडेशी, भूगावमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला https://goo.gl/E3y22D

15. दादरच्या शिवाजी पार्कात रंगला माजी क्रिकेटपटूंचा सामना, अजित वाडेकरांसह लिटल मास्टर सुनिल गावसकरही मैदानात http://abpmajha.abplive.in/live-tv

माझा कट्टा : तुकारामांची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा अवलिया माझावर, रात्री 9 वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी नातळनिमित्त दिलखुलास गप्पा

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 23 december 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV