एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/02/2018

 

 1. अवघ्या 15 मिनिटात गारपिटीनं मराठवाडा आणि विदर्भाला धुतलं, गारपिटीने बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला, पिकं डोळ्यांदेखत भुईसपाट https://goo.gl/pJo8dy


 

 1. गारांच्या तडाख्याने चार वृद्धांचा मृत्यू, वाशिम आणि जालना जिल्ह्यातील घटना https://goo.gl/KGw3Y1


 

 1. कोल्हापुरात ज्या गोष्टींची सुरुवात होते, त्या गोष्टी देशभरात पोहचतात, शरद पवारांकडून कोल्हापुरकरांवर स्तुतिसुमनं https://goo.gl/T9DHN1 तर मामाच्या गावची मुलगी करायचं राहिल्याची मिश्किल शब्दात खंत व्यक्त https://goo.gl/CZ6q9A


 

 1. 'आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरणारे नाही.. लिहिला की फेकला' सांगलीतील एसटी कर्मचाऱ्याची फेसबुक पोस्ट परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना झोंबली, कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई https://goo.gl/t8eqX3


 

 1. अन्नदात्यासाठी अन्नत्याग... 19 मार्चला 'किसानपुत्र' पुन्हा एकवटणार, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय आंदोलनाची हाक https://goo.gl/a7C5sd


 

 1. भंगारांच्या अनधिकृत गोडाऊनमुळे मुंबईत पुन्हा आगीचा भडका, मानखुर्दच्या मंडाला भागातले भंगार गोडाऊन खाक, दूरपर्यंत धुराचे लोट https://goo.gl/n1WDJE


 

 1. अयोध्या प्रकरण : वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्यास परवानगी देण्याचा तोडगा मौलाना सलमान नदवींना भोवला, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डातून हकालपट्टी http://abpmajha.abplive.in/


 

 1. व्यवस्था बदलास वेळ लागतो, मात्र देश बदलाच्या दिशेनं, अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींचा भारतीयांशी संवाद https://goo.gl/uUMSWc


 

 1. तब्बल 30 तासानंतर जम्मूतील सुंजवाँ कॅम्पमधील ऑपरेशन संपलं, चार दहशतवाद्यांचा खात्मा, तर पाच जवान शहीद, एका जवानाच्या वडिलांचाही मृत्यू https://goo.gl/3LxEEK


 

 1. नोटाबंदीला 15 महिने होऊनही जुन्या नोटा मोजण्याचं काम सुरुच, पीटीआयच्या माहिती अधिकार अर्जाला रिझर्व बँकेचं उत्तर http://abpmajha.abplive.in/


 

 1. नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीच्या मृत्यूचं गूढ उकललं, नोकर किसन मुंडेनी हत्या केल्याचं उघड, हत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/boQgHz


 

 1. चिनी मांजाने पुन्हा केला घात, गळा चिरलेल्या पुण्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, सुवर्णा मुजुमदार यांची मृत्यूशी झुंज अपयशी https://goo.gl/F3LJfq


 

 1. परीक्षेत कॉपी करण्यासाठी कॉलेजचे सीसीटीव्ही फोडले, बीडमधल्या मिलिया महाविद्यालयातील प्रकार, अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल https://goo.gl/XkreyL


 

 1. फोटो एडिट करुन ब्लॅकमेलिंग, व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर करणं नाशिकमधील तरुणीला महागात, पीडित तरुणीकडून सायबर पोलीसात अज्ञाताविरोधात तक्रार https://goo.gl/MK8BBh


 

 1. मागवला 48 हजाराचा निकॉनचा कॅमेरा, हाती मिळाले लोखंडी पाईपचे तुकडे, फ्लिपकार्टच्या अजब कारभाराचा मुंबईतल्या तरुणाला फटका, पोलिसांत फसवणुकीची तक्रार https://goo.gl/gqCjgL


 

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, दोन हजाराची मौत आणि बारा हजाराची अब्रू !! https://goo.gl/Fcr94h

माझा कट्टा : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin on 11th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV