एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/01/2018

 1. धुळ्याचे शहीद जवान योगेश भदाणेंचं पार्थिव मूळ गावी दाखल, कुटुंबीयांसह ग्रामस्थांना शोक अनावर, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार https://goo.gl/XKr7Za 1. पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान तर, उरीमध्ये घुसखोरी करणाऱ्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय लष्कराची मोठी कारवाई https://goo.gl/fuLrin 1. ‘चाय पे चर्चा’ करत सुप्रीम कोर्टातील वाद मिटला, महाधिवक्ता वेणुगोपाल यांचं स्पष्टीकरण, प्रकरणावर पडदा पडल्याचा बार काऊंसिलचाही दावा https://goo.gl/h1knZo 1. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई हत्याकांड प्रकरणी 6 जण दोषी, एकाची निर्दोष मुक्तता, 18 जानेवारीला शिक्षेची सुनावणी https://goo.gl/QpQC1d 1. ठाण्यातल्या सरकारी दवाखान्यातून चोरी झालेलं अर्भक 24 तासात सापडलं, आरोपी महिलेला डोंबिवलीमधून अटक https://goo.gl/DWUZXJ 1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/tiwdZ3 1. 26 जानेवारीला मुंबईत ‘संविधान बचाव सत्याग्रह’, राजू शेट्टींच्या कल्पनेतून शरद पवारांसह दिग्गजांच्या हजेरीत लाँग मार्च https://goo.gl/LvyAi6 1. पीएमपीएमएलच्या बसचालकांवर बडतर्फीची कारवाई, सतत गैरहजर राहिल्याने 158 चालकांना अध्यक्ष तुकाराम मुंढेंचा दणका https://goo.gl/MxPt7G 1. आता चेहराही ठरणार 'आधार' पडताळणीचा पर्याय, 1 जुलै 2018 पासून चेहऱ्यावरुन नोंदणीकृत आधार कार्डाची पडताळणी https://goo.gl/Ye3qzB 1. नागपुरातील दोन हजार तरुणांना एचसीएलमध्ये नोकरी, अभियांत्रिकीच्या मुलांवरील स्थलांतराची वेळ टळली, मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या उपस्थितीत कंपनीच्या नागपूर कॅम्पसचं उद्घाटन http://abpmajha.abplive.in/live-tv 1. सोलापुरात नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळला, भाविकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, थरार कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/PmJHX5 1. औरंगाबाद जिल्ह्यातलं दुष्काळग्रस्त मुरुमखेडा पाण्याने समृद्ध, 111 शेततळ्यांमुळे गावात जलक्रांती, ‘माझा’चा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/ 1. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दोन मराठी तरुणांनाच प्रवेशबंदी, सरकारविरोधी आंदोलन केल्याचा राग मनात ठेवून युवकांना प्रवेश नाकारला https://goo.gl/KNL3fn 1. महाराष्ट्राच्या लेकीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते दीक्षा दिंडेला राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान https://goo.gl/jEEHQf 1. विराट कोहलीच्या शतकानंतरही सेन्च्युरियन कसोटीत टीम इंडिया पिछाडीवर; दुसऱ्या डावात बुमराचा वेगवान मारा, सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेचे दोन गडी बाद https://goo.gl/k9tjdK


इस्रायलला आपण कह्यात का घेतोय? विशेष चर्चा आज रात्री 8.30 वा.

माझा विशेष : जखम भरली, व्रण मिटणार का?.. न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांचा वाद ‘चाय पे चर्चेने’ मिटला, मग पत्रकार परिषदेचा अट्टाहास कशासाठी होता? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin on 15th january 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV