एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/02/2018

 

 1. भाजप आमदार आशिष देशमुखांचे वडील आणि काँग्रेसचे माजी मंत्री रणजित देशमुखांना आठवड्याभरात दुसरा दणका, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस https://goo.gl/VbTpss


 

 1. पीएनबी घोटाळा : बँकेच्या ब्रिच कँडी शाखेचा माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीसह तिघांना बेड्या, सीबीआयची कारवाई, आरोपी सीबीआय कोर्टासमोर हजर https://goo.gl/Fkyv8H


 

 1. नीरव मोदीने बँक खाते मनमोहन सिंग सरकारच्या काळात उघडले, घोटाळा मात्र मोदी सरकारच्या काळातलाच, शरद पवारांचा आरोप https://goo.gl/8872t9


 

 1. पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती, आणि..., 'मोदी' आडनावावरुन संजय राऊत यांचा पंतप्रधानांना टोला, तर आशिष शेलारांकडून तिखट शब्दात उत्तर https://goo.gl/yUwkjC


 

 1. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगात रवानगीनंतर कैद्यांकडूनही मारहाण https://goo.gl/Srj5FS , तर छिंदमच्या हकालपट्टीनंतर अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट https://t.co/QZ9IhWIrbj


 

 1. शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अन्यथा आम्ही त्याला हद्दपार करु, खासदार संभाजीराजेंचा इशारा https://goo.gl/NHN2FV


 

 1. डी.एस. कुलकर्णींना पत्नी हेमंती यांच्यासह दिल्लीतून अटक, कोर्टानं संरक्षण काढल्यानंतर पहाटे पाच वाजता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई https://goo.gl/dCKjiU


 

 1. मदतीसाठी फोन करुनही पोलिसांचं दुर्लक्ष, नागपूरमधील अपघातात सात जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचे शेवटचे क्षण कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/aoPxWu


 

 1. राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी नरेंद्र-देवेंद्रांचे कान टोचले, राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा https://goo.gl/SVJbzZ


 

 1. गारपिटीची नुकसान भरपाई लगेच दारात येऊन द्यायची का? दिवाकर रावतेंच्या सवालाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा संताप https://goo.gl/hXcgs8


 

 1. उस्मानाबादेत चाऱ्याचं बेणं म्हणून वाळलेल्या गवताचं वितरण, शेतकऱ्यांचा संताप, योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार https://goo.gl/mqYVau


 

 1. पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन व्यावसायिकाची आत्महत्या, पुण्यातील घटनेनं खळबळ, कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं https://goo.gl/7qGBTg


 

 1. पती पॉर्नच्या आहारी गेल्याने संसाराची वाताहत, पॉर्न साईट्सवर बंदीसाठी 27 वर्षीय विवाहितेची सुप्रीम कोर्टात धाव https://goo.gl/xieYdp


 

 1. ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यापासून दूर पळते, ज्येष्ठ अभिनेत्री रेखाच्या प्रेमभंगाचं दु:ख ओठावर, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘यश चोप्रा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात रेखा भावनिक https://goo.gl/rT62Tq


 

 1. भारतात अमेझॉनला रोखण्यासाठी 'वॉलमार्ट' कंपनी 'फ्लिपकार्ट'ला विकत घेणार, कंपनीकडून फ्लिपकार्टचे 40 टक्के शेअर्सच्या खरेदीची तयारी https://goo.gl/Sa7pef


 

BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी आणि अँकर अश्विन बापट यांचा ब्लॉग - आरसा दाखवणारा ‘आपला मानूस’ https://goo.gl/ofj75A

सिंहासन : बाबरी पतनाची कहाणी, पाहा आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin on 17th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV