एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/10/2017

राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

By: | Last Updated: 11 Oct 2017 06:12 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/10/2017

1. काश्मीरमधील बंदिपुरातील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र मिलिंद खैरनार शहीद, धुळे जिल्ह्यावर शोककळा, दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान https://goo.gl/uP9x3z

2. देशभरातील पेट्रोल पंप चालकांचा 13 ऑक्टोबरचा नियोजित संप मागे, मात्र महाराष्ट्रातील संप मागे घेण्याबाबत अद्याप चर्चा सुरु https://goo.gl/w7pB4E

3. नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 46.28 टक्के मतदान, 578 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, उद्या निकाल https://goo.gl/Ez3quV

4. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 116 मध्ये पोटनिवडणूक, शिवसेना-भाजपमध्ये चुरशीची लढत, उद्या निकाल https://goo.gl/CbD5VB

5. अभिनेता अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष, गजेंद्र चौहान यांच्या जागी नियुक्ती, चित्रपटसृष्टीतून सरकारच्या निर्णयाचं स्वागत https://goo.gl/jvnaXy

6. पंचांग फाडून टाका सांगणारा आदेशच येणं बाकी, फटाकेबंदीवरुन उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/g2gd7d तर आम्ही हिंदुत्ववादी, फटाकेबंदी करणार नाही, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/6k95hP

7. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, फेरीवाले मराठी असले तरीही हटवा, मुंबई महापालिका आयुक्तांच्या भेटीत राज ठाकरेंची मागणी https://goo.gl/NndA3J

8. मुंबईकरांनो, मयुरेशसाठी 'इथला' एक तरी वडा-पाव विकत घ्या, एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मयुरेशच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचं आवाहन  https://goo.gl/KGtF3T

9. कुठेही पळा, अटक करणारच, कायदा सर्वांना समान; उदयनराजे आणि शिवेंद्रराजे  यांच्यातील आनेवाडी टोलनाका राड्यावरुन विश्वास नांगरे- पाटील यांचा इशारा https://goo.gl/983AGC

10. राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतकडून पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली, हिंसाचारासाठी सव्वा कोटी रुपये वाटल्याचंही मान्य https://goo.gl/sqcesf

11. अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वर्षभरात तक्रार करण्याची अट https://goo.gl/GRjJWX

12. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी मनसेचा आक्रमक पवित्रा, यवतमाळमध्ये  कृषी कार्यालयात तोडफोड https://goo.gl/ozx87N

13. नाशिकमध्ये गोदावरी आणि दारणा नदीला पूर, राज्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, तर पुणे, धुळे आणि मराठवाड्यातही तुफान पाऊस http://abpmajha.abplive.in/

14. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर दगडफेक, आपली 'अतिथि देवो भव'ची संस्कृती, दगडफेकीनंतर आर. अश्विनने चाहत्यांना फटकारलं https://goo.gl/fnZwNy

15. महानायक अमिताभ बच्चन यांचा 75 वा वाढदिवस, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांकडून शुभेच्छा, तर राज ठाकरेंकडून व्यंगचित्राची खास भेट https://goo.gl/Be5Ap1

Birthday Special:  अमिताभ बच्चन- 75 वर्षे, 75 किस्से! https://goo.gl/QFTWGF

माझा विशेष : ग्रामपंचायत निकालांचं गौडबंगाल! पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग: खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस? https://goo.gl/qZKVo4

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV