सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू

सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू

सांगली : पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजता भीषण दुर्घटना घडली. पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन लहान मुले, 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सर्वजण कोल्हापुरातील माले गावातील रहिवाशी आहेत.

पंढरपूरहून परतत असताना मिरज-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला धडक दिल्याने दुर्घटना घडली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: accident sangali travels
First Published:
LiveTV