अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली

अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे.

अमरावतीत विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल्याची आरोपींची कबुली

अमरावती : अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे.

काल (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं आहे.  याप्रकरणी ३ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दोघांनी तिला गाठून तिच्यावर उकळतं तेलं फेकलं.

या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: accused throwing boiled oil of 9th standard girl student in Amravati latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV