तब्बल 106 बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकऱ्या जाणार!

चौकशीअंती बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना बडतर्फ करुन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत.

Action will be taken against children of bogus 106 freedom fighters latest update

बीड : बीडमधील बोगस 106 स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकऱ्या जाणार आहेत. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसताना बीड जिल्ह्यातील काही लोकांनी बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असल्याचं प्रतिज्ञापत्र देऊन विविध शासकीय विभागातील नोकऱ्या बळकावल्या होत्या.

 

याबाबत चौकशीअंती बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना बडतर्फ करुन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत. यामुळे शासकीय नोकरीचा लाभ घेत असलेल्या बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे धाबे दणाणले आहेत.

 

ऑगस्ट २००५ रोजी बीड जिल्ह्यातील ३५५ प्रकरणी फेरपडताळणी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. पालकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील २९८ स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन व सवलती तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते.

 

यानुसार आता बीड जिल्ह्यासह राज्यभरात शासकीय सेवेत असलेल्या बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना बडतर्फ (सेवेतून कमी) करून फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Action will be taken against children of bogus 106 freedom fighters latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभूंना पदावरुन काढलं : पृथ्वीराज चव्हाण
बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभूंना पदावरुन काढलं :...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कर्तृत्त्ववान

सांगलीच्या जवानाचं डोकलाममध्ये अपघाती निधन
सांगलीच्या जवानाचं डोकलाममध्ये अपघाती निधन

सांगली : जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशिद (वय

मजुरीला जाण्यासाठी सुट्टी द्या, तिसरीतील विद्यार्थिनीचं शिक्षकांना पत्र
मजुरीला जाण्यासाठी सुट्टी द्या, तिसरीतील विद्यार्थिनीचं...

धुळे : विविध कारणं देऊन विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारल्याचं

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

चंद्रपूर : काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/09/2017   1. सत्तेतून बाहेर पडण्याचा

साईनगरी 40 मिनिटांवर, मुंबई-शिर्डी विमानाची यशस्वी चाचणी
साईनगरी 40 मिनिटांवर, मुंबई-शिर्डी विमानाची यशस्वी चाचणी

मुंबई/शिर्डी : आता देशभरातल्या भाविकांना साईबाबांचं दर्शन

औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचं मांस?
औरंगाबादमध्ये बिर्याणीत कुत्र्याचं मांस?

औरंगाबाद : रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान! कारण

तुळजापुरात रेल्वे पोलिसाला महसूल कर्मचाऱ्याची मारहाण
तुळजापुरात रेल्वे पोलिसाला महसूल कर्मचाऱ्याची मारहाण

उस्मानाबाद : तुळजापुरातील पोलिस आणि महसूल प्रशासनातील वाद आता

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर
शेतकऱ्याच्या पोराची कमाल, जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर

सातारा : साताऱ्याचा गिर्यारोहक आशिष माने याने जगातील आठवं सर्वोच्च

नांदेड महापालिकेसाठी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात!
नांदेड महापालिकेसाठी भाजप संपूर्ण ताकदीनिशी मैदानात!

नांदेड : नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप पहिल्यांदाच