होळीला काटेश्वराची झाडं जाळण्याची प्रथा थांबवा, सयाजी शिंदेंचं आवाहन

By: अमित भंडारी, एबीपी माझा | Last Updated: Sunday, 12 March 2017 1:40 PM
होळीला काटेश्वराची झाडं जाळण्याची प्रथा थांबवा, सयाजी शिंदेंचं आवाहन

मुंबई : होळीच्या दिवशी वाईट गोष्टींना जाळण्याचा हेतू केंद्रभागी ठेवून झाडांना जाळलं जातं. मात्र यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याने झाडं जाळण्याची प्रथा बंद व्हावी, असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं आहे.

अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली!

होळीच्या दिवशी प्रामुख्याने अनेक भागात काटेश्वर नावाच्या झाडाची होळी केली जाते. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने हे झाड अंत्यत महत्वाचं असल्याचंही सयाजी शिंदे यांनी सांगितलं.

सयाजी शिंदेंच्या झाडांवर कुऱ्हाड चालवणारा विकृत सापडला!

होळी मोठी करण्याची गावागावत स्पर्धा लागते. त्यामध्ये काटेश्वराची झाडं मोठ्या प्रमाणात जाळली जातात, पण त्यामुळे निसर्गासोबतच हजारो पशुपक्षांचंही नुकसान होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले.

अभिनेते सयाजी शिंदेनी लावलेली झाडं तोडणारा छगन मदने अटकेत

काटेश्वर झाडाला उन्हाळ्यात फुलं येतात, त्यात दव साचतं. 40 ते 50 प्रकारचे पक्षी हे पाणी पितात आणि होळीला ही झाडं आपण जाळतो, त्यामुळे किमान पक्ष्यांचा विचार करुन तरी झाडं जाळू नये, असं आवाहन सयाजी शिंदेंनी केलं.

पाहा व्हिडिओ :

First Published: Sunday, 12 March 2017 1:14 PM

Related Stories

मुंबई-गोवा महामार्गावर झाडं कोसळलं, महामार्ग ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर झाडं कोसळलं, महामार्ग ठप्प

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ झाड पडल्यानं

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/04/2017

तुरीवरुन फडणवीस सरकारकडून कागदी घोडे नाचवणे सुरुच, सर्वाधिक तूर

जळगावातील चिमुरडीवर उपचारांसाठी सलमान खानची मदत
जळगावातील चिमुरडीवर उपचारांसाठी सलमान खानची मदत

जळगाव : जळगावात रक्तवाहिनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या

भूमाफियामुळे माजी पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ
भूमाफियामुळे माजी पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ

नागपूर: भूमाफियांमुळे अनेक लोकं देशोधडीला लागल्याचे आपण अनेकदा

कर्ज फेडण्यासाठी हुंड्याची मागणी, विवाहितेची आत्महत्या
कर्ज फेडण्यासाठी हुंड्याची मागणी, विवाहितेची आत्महत्या

सोलापूर : एकीकडे ‘एबीपी माझा’च्या पुढाकाराने राज्यभरातील

इंजिनिअरिंग सीईटी तूर्तास 'होल्ड'वर!
इंजिनिअरिंग सीईटी तूर्तास 'होल्ड'वर!

नवी दिल्ली: देशभरातील इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात

30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या : मुख्यमंत्री
30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या : मुख्यमंत्री

मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर

वय वर्षे पाच, कोणताही प्रश्न विचारा, उत्तर मिळवा
वय वर्षे पाच, कोणताही प्रश्न विचारा, उत्तर मिळवा

सोलापूर : जगातील देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, त्यांचे

विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट
विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : लोकपाल बिलाच्या दुरुस्तीच्या नावावर त्याची

तुडुंब भरलेलं उजनी शून्य टक्क्यांवर, शेतकरी चिंतेत
तुडुंब भरलेलं उजनी शून्य टक्क्यांवर, शेतकरी चिंतेत

सोलापूर : सलग दोन वर्षांच्या भीषण दुष्काळानंतर तुडुंब भरलेलं उजनी