कातकरी आदिवासी महिला बिनविरोध सरपंच

जंगलाच्या पायथ्याशी घर असलेली, मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणारी ही गरीब महिला नारुर कर्याद नारुर या ऐतिहासिक ओळख असलेल्या गावाची सरपंच बनली आहे.

कातकरी आदिवासी महिला बिनविरोध सरपंच

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच एक कातकरी आदिवासी महिला सरपंच झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजातील ही महिला बिनविरोध सरपंचपदी निवडली गेली.

अलका रमेश पवार असं या महिला सरपंचाचं नाव आहे.

जंगलाच्या पायथ्याशी घर असलेली, मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणारी ही गरीब महिला नारुर कर्याद नारुर या ऐतिहासिक ओळख असलेल्या गावाची सरपंच बनली आहे.

गाव पॅनेलतर्फे त्या सरपंचपदासाठी रिंगणात होत्या. शिवसेनेतर्फे दाखल आणखी एका आदिवासी महिलेचा अर्ज छाननीत बाद ठरल्याने अलका पवार बिनविरोध निवडल्या गेल्या.

कुडाळ तालुक्यातील रांगणागडाच्या पायथ्याशी वसलेले नारुर कर्याद नारुर हे गाव. या गावात हे कातकरी आदिवासी गुण्यागोविंदाने राहतात.

या वर्षी सरपंच पदाच्या आरक्षणात नारुरसाठी सरपंचपद आदिवासी महिलेसाठी राखीव आहे. कायम गावकुसाबाहेर राहिलेल्या या आदिवासींना आरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली.

या निवडणुकीसाठी गावाने बनविलेल्या ‘श्री देवी महालक्ष्मी, श्री देव खापरा, जयभवानी ग्रामविकास आघाडी’च्यावतीने ग्रामस्थांनी. पवार यांची सरपंच पदाचा उमेदवार म्हणून निवड केली.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV