सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलकांनी रक्ताच्या बाटल्या फोडल्या

पोलीस आणि आंदोलकात झोंबझोंबी झाली. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलकांनी रक्ताच्या बाटल्या फोडल्या

सोलापूर: ऊसाला दर  मिळावा यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण मिळालं.  सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर जोरदार राडा झाला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडून घेतल्या.

पोलीस आणि आंदोलकात झोंबझोंबी झाली. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोरही आंदोलन करण्यात आलं. आजपासून बळीराजा शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केलं आहे.

ऊसाला योग्य दर जाहीर करेपर्यंत बळीराजा संघटना कारखान्यासमोर तळ ठोकणार आहे. आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे.

लोकमंगल साखर कारखाना शेतकरी संघटनेच्या रडारवर आहे. त्यामुळेच इथे  सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सहकार मंत्र्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला

सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्त वाढवला आहे. सुभाष देशमुख यांच्या घरासमोरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सतर्कता बाळगण्यात आली आहे. शेतकरी संघटना लोकमंगल कारखान्यासमोर तळ ठोकून आहेत. सहकार मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन चालू असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Agitation near Subhash Deshmukhs house
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV