अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा पंतप्रधानांकडून आढावा

By: | Last Updated: > Thursday, 28 May 2015 3:08 PM
Ahamadnagar beed and parali new railway track project

मुंबई: राज्यातील अहमदनगर-बीड-परळी या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भू-संपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये राज्य शासनातर्फे 50 टक्के आर्थिक सहभाग असेल.

 

याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत दिली. पंतप्रधानांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

 

पंतप्रधान कार्यालयातर्फे सुरु करण्यात आलेल्या Pro Active Governance And Timely Implimentation (प्रगती) पोर्टलच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून महत्वपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेण्यात येणार आहे. काल बुधवारी दुपारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंग मध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाचा आढावा मुख्य सचिवांकडून जाणून घेतला.

 

हा प्रकल्प पूर्ण व्हावा अशी लोकभावना असून विकासासाठी चालना देणाऱ्या या प्रकल्पासाठी 1650 पैकी 1250 हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली.

 

नुकतेच या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाची अंतिम किंमत कळविली आहे. राज्याच्यावतीने देण्यात येणाऱ्या 50 टक्के हिश्याबाबतचा प्रस्ताव आगामी मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल. या प्रकल्पातील अहमदनगर ते नारायणडोह या 12 कि.मी अंतराचे ट्रॅक लिंकिंगचे काम पूर्ण झाले असून नारायणडोह ते परळी दरम्यानच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. 

 

राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 208 कोटी रुपये वितरीत केले असून रेल्वे मंत्रालयाने देखील 274 कोटी रुपये वितरीत केले आहे. मार्च मध्ये झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये नवी मुंबई विमानतळ आणि एप्रिल मध्ये सोलापूर येथील एन.टी.पी.सी या प्रकल्पांबाबत पंतप्रधानांकडून आढावा घेण्यात आला होता. 

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ahamadnagar beed and parali new railway track project
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर
तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा...

नांदेड: मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केलं, त्यालाच ते मिळालं की

कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा
कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा

कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास

 VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण
VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

बुलडाणा :  बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या पऱ्हाड कोचिंग

तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी फुल्ल, धरणाचे 18 दरवाजे उघडले
तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी फुल्ल, धरणाचे 18 दरवाजे उघडले

औरंगाबाद : औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून काल (गुरुवार) रात्री ११

सदाभाऊंकडून नव्या संघटनेच्या नावाची घोषणा
सदाभाऊंकडून नव्या संघटनेच्या नावाची घोषणा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यांनतर कृषी

माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे

मुंबई : राज ठाकरेंनी फेसबुक पेजच्या लॉन्चिंगवेळी नारायण राणेंवर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घटस्थापनेदिवशीच शासनानं खुशखबर

नारायण राणेंचा राजीनामा, नितेश राणेंचं काय?
नारायण राणेंचा राजीनामा, नितेश राणेंचं काय?

कुडाळ : “तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा

काँग्रेसची नांदेडमधील मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे
काँग्रेसची नांदेडमधील मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय...

नवी दिल्ली : नांदेडमधील काँग्रेसची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले
फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

मुंबई: “विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील